पान:अकबर १९०८.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२

खंड ४ थें.

 मी तर त्या शब्दांचा रूढार्थच घेतों. मान मर्यादा आणि कर्तव्य यांच्या अनुरोधानें मी कदापि स्वदेशाच्या विरुद्ध कोणतेही काम करावयाचा नाहीं. मग खुद्द बादशहा सलामत त्याविषयीं मला स्वतः कां आज्ञा देईनात. तशा स्थितीत त्याच्या कृपादृष्टीनें सहज प्राप्त होणाऱ्या संपूर्ण अधिकारांनाही तृणवत् समजून मी त्यांचा परित्याग करीन.
 पुरुष -- खरें आहे. आपलें झणणें अत्यंत उचित् आहे.. परंतु, आपल्या अगर आपल्या देशवासी लोकांच्या हांतून जी गोष्ट पूर्ण होण्याची आशा नाहीं ती गोष्ट करण्याची ते आपल्याला आज्ञा करतील असें आपण कशावरून समजतां ?
 हें त्या पुरुषाचें भाषण ऐकून सिद्धराम कांहींसा चपापला. तितक्यांत त्याला एकाएकीं सल्हाणाच्या भाषणाचें स्मरण झालें. तेव्हां त्यानें त्या अज्ञात पुरुषाकडे न्याहाळून पाहून झटलें, “ हें काय आपण म्हणतां ?. बादशहा सलामत यांना तृष्णा नाहीं काय ? "
 अज्ञात पुरुषानें अत्यंत गंभीरस्वरानें म्हटलें, पहा ! कुमार महा- शय, एवढावेळपर्यंत आपलें भाषण सावधपणाचें होतें. परंतु, हैं काय आपले शहाणपण ? कीं, आपण बादशहा सलामत यांच्या नगरांतील एका अनोळखी मनुष्यासमोर अशाप्रकारचें अविचाराचें शब्द मुखावाटें काढून बसलांत !
 सिद्धराम - आपण पाहिजे तर त्यांना खुशाल अविचाराचे शब्द म्हणा. परंतु, मी आपल्या निर्मळ अंतःकरणांतील गोष्ट आपणांस सांगि- तली. हें खरें कीं, मी आपणांस जाणीत नाहीं. परंतु, आपल्या एकंदर संभाषणावरून माझी अशी खात्री होत आहे कीं, आपण माझ्यासारख्या अडाणी परंतु निष्कपट मनुष्याचें भाषण मनास आणून त्याला कांहीं अपकार करण्याचें मनांत आणणार नाहीं.
 सिद्धरामाचें तें निष्कपट भाषण श्रवण करून त्या अज्ञात पुरुषाचें मुखकमल कांहींसें प्रफुल्लित झाल्यासारखें झालें. तो पुरुष सिद्धरामाच्या भाषणांतील माधुर्यापेक्षां निर्मळपणावरच अधिक लुब्ध झालेला होता.. त्याला मिथ्याप्रशंसा अर्थात् खुशामत अगदी आवडत नव्हती. परंतु, कुमाराचें तें भाषण अंतःकरणापासून निघालेलें असल्यामुळे तो अत्यंत