पान:अकबर १९०८.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

६१

 मारिली आणि ' आपल्या सेनेंतील रजपूत लोकांशी आपला उत्तम- प्रकारचा परिचय झाला काय? असे विचारिलें. जेथें जावें तेथें सर्व लोक आपणांस आपल्या नांवानें ओळखितात, हें पाहून सिद्धरामास फारच आश्चर्य वाटलें. तथापि त्यानें लागलींच तेथें थबकून उत्तर दिलें, ' होय. आजच त्यांचा माझा परिचय होऊन मीं त्यांचें आधिपत्य स्वीकारिलें आहे. तें असो. परंतु, आपण मला कसे ओळखिलें ?
 तो पुरुष म्हणाला, आपल्या चिन्हविशेषांवरून मी आपणांस ओळ- खिलें. आपल्यासारख्या दुसऱ्याही कित्येक अधिकारी लोकांशी माझा परि- चय आहे आणि आपणांला आपल्या पदाचा आजच अधिकार मिळाव- याचा होता ही गोष्टही मला पूर्वीपासून माहित होती, त्यामुळे अनुमानानें मला आपणांस ओळखितां आलें. आपणांला आपलें पद कसें काय वाटतें ? असे माझ्यावळ येऊन बसा. "
 याप्रमाणें त्याचें सलगीचें भाषण ऐकून सिद्धराम त्याचेजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, 'माझ्या पदाविषयीं आपण विचारितां काय ? निःसंदेह तें अत्यंत बहुमानाचें आहे. मी जर त्याबद्दल माझे स्वामी आणि अनुग्रहकर्ते बादशहा सलामत त्यांना शतवार धन्यवाद दिलें नाहींत तर माझ्यासारखा कृतघ्न कोण असणार आहे ?,
 अज्ञात पुरुष म्हणाला, आपलें म्हणणें यथार्थ आहे परंतु, आपण मला हें सांगा कीं, बादशहांची यथार्थ सेवा करण्याकरितां आला आहांत अथवा अधिकार सुख भोगण्याच्या इच्छेनें आला आहात ?
 कुमार -- आपला हा प्रश्न विचारणीय आहे. तरीही पण मी याक्षण इतके सांगुं शक्तों कीं, मीं यावत्शक्य बादशहांची सेवा मानमर्यादा आणि कर्तव्यपूर्वक करण्याचा विचार केला आहे. ही गोष्ट तर आपणांला एवढ्यावरूनच कळून येईल कीं, मीं केवक स्वेछेनुसार या पदाचा विचार केला आहे.
अज्ञात पुरुष ह्मणाला, आपण मोठ्या चतुराईनें उत्तर दिलेत. परंतु, आतां असा प्रश्न आहे की, मान मर्यादा आणि कर्तव्य यांचा आपण काय अर्थ समजतां  ? या शब्दांचा अर्थ अत्यंत गहन आहे. "
 सिद्धराम - होय, कदाचित् दुसऱ्या लोकांकरितां तसें असेल. परंतु,