पान:अकबर १९०८.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
खंड ४ थें.

 कशावरून नाहीं करणार ? शेवटीं त्यानें पूर्णपणें विचार करून परत उद्यानाचा मार्ग धरला.
 हें उद्यान अत्यंत रमणीय असल्यामुळे तेथें जातांच सिद्धरामाची 'चित्तवृत्ति गारीगार होऊन गेली. तेथें अनेक स्वच्छ आणि सरळ असे छायापथ होते. त्यांचे दोहोंबाजूंचे वृक्ष अत्यंत सधन असून मधील जमिनी सुंदर गुळगुळीत दगडांच्या केलेल्या होत्या. उद्यानाच्या मध्यभागीं लहान मोठें संगमरवरी पाषाणांचे हौद बांधलेले असून त्यांमध्यें कारंजी उडत होतीं. ठिकठिकाणी फुलझाडांचे वाफे आणि सधन निकुंजाची शीतल छाया हीं पथिकजनांच्या चित्तास लोभवीत होतीं. कांहीं वेळपर्यंत कुमार त्या बृहदुद्यानांत फिरत होता तरी त्यास तेथें कोणीही भेटलें नाहीं. परंतु, तेथून कांहींसा तो पुढे जाऊन पहातो तों एका घनदाट वृक्षाच्या शीतल छायेंत एक मध्यम वयाचा वीर पुरुष बसलेला त्याचे दृष्टीस पडला. त्या अनोळखी पुरुषाच्या मुखावर अशी कांहीं अव- र्णनीय कांति होती कीं, तिच्या योगानें सिद्धरामाच्या हृदयांत एकाएकीं एकप्रकारचा पूज्यभाव उभा राहिला. आजपर्यंत सिद्धरामाच्या अनेक राजपुरुषांशी भेटी झाल्या होत्या. परंतु, सांप्रत जी अज्ञात व्यक्ति त्याचे दृष्टीसमोर होती, तिची एकंदर प्रभा अशी कांहीं लोकोत्तर होती कीं, तिचें वर्णन करितां येणें अशक्य आहे. ह्यापुरुषाचें मुख अत्यंत गंभीर आणि हास्ययुक्त होतें. दाढी मुळींच नव्हती. त्याचा वर्ण गौर आणि शरिरावरील वस्त्रे साधीं परंतु बहुमोल होतीं. त्याच्या तरवारीच्या मुठीवर सर्वोत्कृष्ट जडाऊ मिन्याचें काम केलेलें होतें आणि शिरोभूषणावर अस- लेला एक असामान्य हिरा आपल्या तेजो लहरींनीं त्याचे सर्व शरीर प्रका- शित करीत होता. कुमारानें गुरुपद योगिराज यांच्या मुखावर जी तेज- स्विता अवलोकन केली होती तशीच किंबहुना तीहूनही अधिक अशी तेजस्विता या उद्यानास्थित अनोळखी पुरुषाच्या मुखावर होती. या त्याच्या एकंदर परिस्थितीवरून तो कोणीतरी मोठा दरबारी किंवा मुत्सद्दी अथवा -राजवराण्यांतीलच एकादा पुरुष असावा असा सिद्धरामानें तर्क केला. सिद्धरामाचे मनांत त्याचे अंगावरून पुढे निघून जावें असें होतें. परंतु, तो पुढें जाऊं लागतांच त्या अज्ञातपुरुषानें त्याचें नांव घेऊन त्यांस हांक