पान:अकबर १९०८.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

५९

 सिद्धरामानें विचारिलें, 'तुझी स्वामिनी काण आहे ?,  दासी -- ' क्षमा करा ! यावेळीं मी त्यांचें नांव सांगू शकत नाहीं. आपण जर कृपा करून आज सायंकाळी त्यांचेवर आपल्या दर्शनाचा अनुग्रह कराल तर त्या स्वतःच आपणांला सर्व मजकुर निवे- दन करितील. रात्री सुमारें दहा वाजणेचे सुमारांस आपण त्या मशिदी-- जवळ या.' इतकें बोलून तिनें तेथून जवळ असलेल्या सूर्यप्रकाशांत चम- कणाऱ्या स्वर्णमय घुमटांच्या एका सुंदर गृहाकडे अंगुलीनिर्देश केला. कुमार सिद्धराम -- आपल्या मनांत किंचित् दचकून विचार करूं लागला कीं, “ हिला काय बरें उत्तर देऊं ? काय, कोणी कामिनी मला मोहावयास पहाते आहे काय ?” तितक्यांत त्याला त्याच्या इरावतीचें स्मरण झालें. तो पुन्हां मनांशीं ह्मणाला " कांहीं गुप्त राजकीय रहस्य तर नाहीं ! " तत्क्षणीं त्यास अबुलफजलच्या चिताव- णीची आठवण झाली. दासी - कांहो महाशय, आपण असे वीरपुरुष असून एका साधारण स्त्रीची भेट घेण्यांत इतका आगापीछा बघत आहांत ! तेव्हां आपल्या. मनांत कांहीं भीति तर नाहीं आली ?
 भीतीचें नांव निघतांच सिद्धराम क्रोधाविष्ट होऊन तिला ह्मणाला, काय झटलेंस ? कोणी पुरुषानें जर मजपुढें असें भाषण केलें असतें. तर खचीतच यावेळीं मीं खुद्द त्यालाच भीतीचा आस्वाद घ्यावयास लाविलें असतें. परंतु, तूं स्त्री पडलीस, ह्मणून मला तसें कांहीं करितां येत. नाहीं. भी कसला विचार  करीत आहें तें तुला काय ठाऊक ? बरें जा ठरलेल्यावेळी मला त्या मशिदीपाशीं भेट. मी अवश्य तुझ्या स्वामि-- नीच्या भेटीस येईन. "
 दासी झणाली, "आपण मोठी कृपा केलीत. सांगितलेल्या ठिकाणीं मी खास उभी असेन, " इतकें बोलन ती दासी तेथून चालती झाली...
प्रथमतः तिच्या मार्गे मार्गे जाऊन मुकाट्यानें ती कोठें जातें आणि तिला कोणी पाठविलें आहे याचा सुगावा काढावा असें सिद्धरामाच्या मनांत होतें. परंतु, त्यानें  पुन्हां असा विचार केला कीं, कदाचित आपा- प्रमाणें तिच्याही मनांत संशय येऊन ती भलत्याच मार्गाचा स्वीकार