पान:अकबर १९०८.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
खंड ४ थें.

 वर्ण पक्षांचा तुरा त्याचें पदचिन्ह ह्मणून अर्पण केला. हा अधिकारी आपल्या कामाची अंमलबजावणी करण्यांत जरी अत्यंत कडक होता तरी साधारणत: त्याचा मनमिळाऊपणा आणि मित्रप्रेम हे दोन गुण अत्यंत प्रशंसनीय होते. कुमारानें जेव्हां आपली सेना एकरंगी भव्य पोषाख घालून एकसारखी रागेंनें उभी असलेली पाहिली तेव्हां त्याचें चित्त अत्यंत प्रसन्न झालें. त्याच्या सेनेतील सर्व शिपाई उत्तमप्रकारचें आश्वा- • रोहणपटु असून त्यांच्या मुखावर उज्वल कांति आणि वीरता जणूं . झळकत होतीं.
 मुख्य मनसबदाराच्या आज्ञेनुसार सिद्धरामानें आपल्या सेनेकडून 'थोडीशीं कवाईत करविली. त्या प्रसंगी सिद्धरामासही आपल्या अंगच्या विलक्षण अश्वारोहणपाटवाचें प्रदर्शन करण्यास अवसर मिळाला. त्यावेळीं कुलगुरू जर तेथें असते तर आपला शिष्य विद्याबलानें समर्थ झालेला पाहून त्यांस फारच संतोष झाला असतां असो. कांहीं वेळ कवाईतीचे: खेळ वगैरे झाल्यावर तुतारी वाजली. त्यावरून त्या दिवशीचें कृत्य समाप्त झाल्याची सर्वांस सुचना मिळाली. सिद्धरामानें आपल्या षोड्याची बाग- दोर जवळ उभा असलेल्या वत्सनामक सेवकाचे हाती देऊन विश्रांतिस्तव तिथून समीप असलेल्या एका उद्यानांत प्रवेश केला. त्या उद्यानांत केवळ त्याच्याच सारख्या उच्चपदावर युक्त असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी होती. सिद्धरामानें उद्यानांत पाऊल टाकिलें मात्र तो त्याचे मागून एक उच्च घराण्यांतील दासीप्रमाणे दिसणारी तरुण स्त्री येत असलेली त्यानें पाहिली. ती स्त्री सिद्धरामाजवळ येऊन प्रथमतः किंचित दचकून बोलू लागली. ती झणाली, " महाशय, आपलेच नांव सिद्धरामजी आहे काय ? आणि आपणच काश्मीराहून आलातना. ?,
 सिद्धराम - होय. पण है तुह्माला कसे कळलें.,
 दासी झणाली, ' मी तर आपणांला ओळखत नाहींच, पण माझ्या स्वामिनीने आपल्या स्वरूपाचें वर्णन सांगून आपणांस घेऊन येण्यावि- षयीं मला आज्ञा केली आहे. कृपा करून जर आपण मजबरोबर चलाल तर त्या क्षणभर आपणापाशीं कांहीं भाषण करण्याची इच्छा करीत आहेत.