पान:अकबर १९०८.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
५७

 मजकडे निघून या. मी मोठ्या आनंदानें आपणास आलेली आडचण दूर करीन. "
 सिद्धराम ह्मणाला ' जशी आपली आज्ञा. ही आपली मजवर मोठीच कृपा होय.' इतकें भाषण झाल्यावर फैजीचा निरोप घेऊन कुल्लुकासह सिद्धराम तेथून निघाला. तें वेळीं तो आपल्या मनांत म्हणाला, “ खरो- खर मी मोठा भाग्यवान् आहें. आरंभापासूनच माझी सर्व कार्ये निर्वि- नपणें सिद्ध होत चालली आहेत. मला साह्य करणारांचीं आणि सल्लामसलत देणारांची तर मुळींच कमतरता नाहीं. लहान मोठ्या कार्यंत परम बुद्धिमान आणि समर्थ अशा फैजीचें मला साय आहे. परंतु, जर तसेंच कांहीं एकादें संकट उपस्थित झालें तर मला गुरुपदांचें आश्वासन आहेच. अगोदर मंत्री अबुलफजल यांनी मला आश्वासनपूर्वक बादशहा सलामत यांचा उत्तमप्रकारचा परिचय करून देण्याचें अभिवचन दिलेच आहे. आणखी काय पाहिजे ? "

खंड ४ थें.
अकबर.

 सऱ्याच दिवशीं प्रातःकाळी किल्लयाच्या मैदानांत कुमार सिद्धरामानें रजपूत सेनेच्या मुख्य मनसबदाराचे हातीं आपल्या ठरलेल्या सेनाविभागाचें आधिपत्य स्वीकारिलें. सिद्धरामानें सत्कारपूर्वक आपल्या वरिष्ट अधिकान्यास अभिवंदन केलें आणि त्या अधिकाऱ्यानें त्याला एक श्वेत-