पान:अकबर १९०८.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
खंड ३ हैं.

 भाव ठेवीत नाहीं, त्याअर्थी माझें अंतःकरण आपणांविषयीं शंकित असणें कसें संभवेल ? "
 त्यावर कुल्लुक सिद्धरामास म्हणाला, पहा बरें, या तुझ्या भाषणाचें तुला पक्वें स्मरण असूं दे आणि हीही गोष्ट लक्षांत आण कीं कांहीं झालें तरी मानवशक्ति अगदीं परिमित आहे. कोणीही मनुष्य खात्रीपूर्वक सांगूं शकणार नाहीं कीं, केव्हां आणि कोणत्या कार- णानें त्याच्या अंतःकरणावर कशाप्रकारचा परिणाम घडेल.
 फैजीनें हंसून ह्यटलें, 'पहा, पुन्हां येथें न्यायाची गोष्ट आली. माझा आपणासारखा अभ्यास झालेला नाहीं. तथापि, आपण थोडीशी सांख्य आणि वेदांत यांची चर्चा करूं. आपण तर या शास्त्रांत परमप्रवीण आहांत. सांप्रत सायंकाळचा सुमार झाला असल्यामुळे वेळही मोठी आनंद- दायक आहे. यावेळी बादशहा सलामत येथें असते तर बरें झालें असतें. आपणाला माहीतच आहे कीं, नाचरंगापेक्षां त्यांना विद्याविषयक चर्चेत अधिक प्रीति आहे.
 कुल्लुक - सन्मित्र महाशय, याहून आनंदाची गोष्ट ती कोणती ? आपल्याबरोबर चार घटका अशा गूढ शास्त्रविषयांवर वाद- विनोद झाला असत तो मला हितप्रदच आहे. परंतु, अडचण इतकींच कीं, उदईक प्रातःकाळींच सिद्धरामास सेनेचा अधिकार दिला जाणार आहे आणि मलाही काश्मीरास जाण्याकरितां आजच्या रात्रीतच तयारी करून ठेवावयाची आहे. तिकडे जाण्याला परवांचेच दिवशीं सुमुहूर्त आहे. करितां सांप्रत आपण आम्हाला क्षमा करालः अशी आशा आहे. आपण जो आज आमचा इतका सत्कार केला, त्याबद्दल आह्मी आपलें अत्यंत आभारी आहोंत.
 फैजी-काहीं चिंता नाहीं.
 इतकें भाषण होऊन सिद्धराम आणि कुल्लुक जावयास निघाले असतां पुन्हां सिद्धरामास उद्देशून फैजी झणाला, पहा बरें, सावध रहा. आपले हातून कोणतीही अनुचित गोष्ट न होईल असें करा. तुमच्यासारख्या तरुणांचे हांतून प्रसंगोपात चूक होण्याचा संभव आहे. याकरितां जर कधीं तुम्हाला जडभारी पडेल तर सरळ