पान:अकबर १९०८.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

९५

 काय ? आणि असले लोक दयाळू बादशहाच्या दरबारीं राहून केवळ छल, कपट आणि विश्वासघात करीत असतील असें आपणांस वाटतें काय ?
 फैजी -- आमच्या बड्या भाईसाहेबांना तर सर्वत्र छल आणि विश्वास- धानच दिसत असतो. परंतु, असें नाहीं. मंत्री महाशयांचा आणि विशे- षतः ज्याच्यावर राज्यांतील अनेक गोष्टींचा भार पडलेला असतो अशा लोकांचा हा एक स्वभावधर्मच आहे. आपण अगदीं निश्चिंत रहा. येथील लोक इतके नीच आणि मूर्ख नाहींत कीं, ते बादशहा सलामत यांच्या विरुद्ध एकाद्या गोष्टींत सल्ला देऊन आपल्या हातानेंच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतील.
 " फैजीचें भाषण ऐकून कुल्लक गंभीरतेनें म्हणाला, CL मित्र महाशय, हा सर्व आपल्या शुद्ध अंतःकरणाचा परिणाम आहे. आपणाला या जगांत वाईट असें कांहीं दिसावयाचेंच नाहीं. परंतु, तसा समज इतर लोकांचा असून चालावयाचें नाहीं. विशेषतः सिद्धरामासारख्या तरुण आणि नव- थर मनुष्यास तर येथें आपणाप्रमाणेंच सर्वांवर सारखा विश्वास बिन- धोकपणें कधींही ठेवतां यावयाचा नाहीं. "
 फैजी - आपलें म्हणणें यथार्थ आहे. परंतु, आपल्या शिष्यासबंधानें माझा आभिप्राय कांहीं वेगळाच आहे. माझें असें ह्मणणें आहे कीं, आरंभापासू- नच त्याचें मस्तक या राजनैतिक प्रपंचांनीं बिघडून जाऊं नये. त्यांनीं प्रथमतः दृढनिश्चय आणि दृढविश्वास त्यांच्या मजबूत पायावर आपल्या कार्यास आरंभ करावा. आह्मीं प्रथमत: जेव्हां या दरबारांत प्रवेश केला, तेव्हां आम्हालांही असेंच मोठें गूढ पडलें होतें. परंतु, आह्मीं आपलें सरळ- पणाचें ब्रीद सोडिलें नाहीं आणि ईशकृपेनें आह्नांवर या घडीपर्यंत तसें संकटही आलें नाहीं. म्हणून मी ह्मणतों कीं, प्रारंभापासून जर त्याच्या मनांत असा प्रत्येक व्यक्तीविषयीं संदेह  रहात गेला तर शेवटीं तो कोणा- वरच विश्वास ठेविनासा होईल. इतकेंच नव्हें, तर तो कदाचित् आम्हां बंधूंचाही विश्वास धरणार नाहीं.
 सिद्धरामानें फैजीकडे पाहून निश्चयाच्या स्वरानें ह्यटलें, ' असें कदापि व्हावयाचें नाहीं. ज्याअर्थी आपण मजबरोबर कोणत्याही प्रकारचा भेद-