पान:अकबर १९०८.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
खंड ३ रें.

 • सिद्धराम - छे, मी यथार्थ सांगतों कीं आपलें आणि आपले बंधू अबुलफजल यांचें नांव सांप्रत फारस देशापासून तो थेट हिंदुस्थानच्या दक्षिण धुरेपर्यंत सर्वतोमुखीं झालें असून, तें असेंच अनंत कालावधी कायम राहील, अशी माझी खात्री आहे.
 फैजी - निःसंदेह, माझ्या वडील बंधूंचें नांव सामान्यत: च सर्व लोक.. च्या हृदयांत अनंतकालपर्यंत वास्तव्य करील. कारण कीं, त्यांचा अकब- रनामा हा ग्रंथ त्यांचें अक्षय स्मारक झाले असून तें लोकांना त्यांच्या नांवाचा. कर्धीही विसर पडूं द्यावयाचें नाहीं. तो ग्रंथ असा अपूर्व झाला आहे कीं, त्याचे पुढे माझे सगळे ग्रंथ तुच्छ आहेत. तथापि, मी त्यांना एक गोष्ट उघड-- पणें सांगितली कीं, आपण अकबर बादशाहास अगदीं अस्मानावर चढ -- वीत चालले आहात. परंतु, कसें झालें तरी तोही मनुष्यच आहे. अर्थात् इतर मनुष्याप्रमाणें त्याचे ठिकाणीही गुणदोषांचें मिश्रण असलें पाहिजे. मला मोठी भीति आहे कीं, भविष्यकाळीं लोक त्यांना बादशाहाची खुशा- मत केल्याचा दोष न लावोत. मी जरी त्यांना इतकें स्पष्ट सांगितलें, तरी देखील त्यांनीं माझें कांहींही न ऐकतां बादशहाची तारीफ लिहिण्याचें काम चालविलेंच आहे. माझ्या भाषणावर त्यांनी मला असा जबाब दिला कीं ज्या गोष्टींबद्दल माझें अंतःकरण पूर्ण साक्ष देत असून, ज्या मला केवळ सत्य वाटत आहेत, त्या गोष्टी लिहिण्याचे काम मीच जर माघार घेतली, तर त्या गोष्टी दुसरा कोण लिहू शकणार आहे ?
 फैजीचें भाषण ऐकल्यानंतर सिद्धराम कांहीं वेळ स्तब्ध राहून आणि विचार करून झणाला, " मी आपणांला कांहीं विचारू इच्छितों. फैजी--- कांहीं हरकत नाहीं, विचारा. मी आपणाला अगदी मोकळ्या मनानें त्याचें उत्तर देईन.
 सिद्धराम - आतां आपल्या जेष्ट बंधूंची गोष्ट निघाल्यावरून त्यांनी सांगि- तलेल्या एका गोष्टीचें मला स्मरण झालें. त्यांनीं मलाही गोष्ट चितवून सांगितली आहे की, बादशहा सलामत यांच्या दरबारीं अनेक छली, कपटी आणि विश्वासघातकी लोक रहात असून त्यांजबरोबर उत्तम प्रकारची सावधगिरी ठेवावी ह्मणून. आपले विचार श्रेष्ठ, पूजनीय आणि यथार्थ आहेत. आपणही बादशहाचे - दरबारी असले मूर्ख व दुष्ट लोक आहेत असें समजतां कीं