पान:अकबर १९०८.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
५३

 फारच चांगल्या दिसून आल्या. तशाच कित्येक साधारण गोष्टीही त्यांत आहेत. परंतु, ज्यांना ह्मणून आपल्या हिंदुशास्त्रग्रंथाचें ज्ञान आहे, त्यांना मात्र त्यांत कांहीं नवीन गोष्ट मिळण्यासारखी नाहीं. आपल्या ग्रंथांतील रूपकादिकांचें मी काय वर्णन करूं ! मला त्यांत फारच गोडी वाटते. हैं. पुढील सुभाषितच पहाना किती बहारदारीचें आहे तें; --,

न चोरहार्यं न च राज हार्यम् ।


न भ्रातृभाज्यं न च भारकारि ॥


व्यये कृते वर्धत एव नित्यम् ।


विद्याधनं सर्वधनप्रधानम् ॥ १ ॥


 ( जे चोराला हरण करितां यावयाचें नाहीं, राजाला हरण करितां यावयाचें नाहीं, भावाला वांटणी करून मागतां यावयाचें नाहीं, ज्याचें कधीं ओझें व्हावयाचें नाहीं आणि ज्याचा व्यय केला असतां जें नित्य - वाढत मात्र जातें तें विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ होय. )
 कां ? श्लोक ह्मणतांना मी कांहीं अशुद्ध उच्चार तर नाहीं केले ? सिद्धराम किंचित् हंसून कुल्लुकाच्या मुखाकडे पाहूं लागला. फैजी- जर कुठें कांहीं चूक झाली असली तर सांगा. सिद्धराम -- आपल्या उच्चरांत कोठें अशुद्ध तर नाहीं. वर्णोच्चार जसे स्पष्ट असावेत तसे नाहींत.
 फैजी— ठीकच आहे. तुमच्यासारखे आमचे वर्णोच्चार कसे असुं शक- तील ? बरें तें असो. आतां आपण एकादें सुभाषित काढा. सिद्धरामानें किंचित् थांबून पुढील सुभाषित झटलें.

स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम् ।


परिवर्तिनी संसारे भृतः को वा न जायते ॥ २ ॥


 ( ज्याच्या जन्मास येण्यानें वंशाची उन्नति होते, तोच खरा जन्मला ह्मणावयाचा. नाहीतर या भ्रमणशील संसारांत मरत कोण नाहीं ? अर्थात् सगळेच जन्मतात आणि सगळेच मरतात ! )
 हें सिद्धरामाच्या तोंडचें अत्यंत मधुर आणि स्पष्ट वाणीनें उच्चारलेलें सुभाषित ऐकून फैजी किंचित् हंसून ह्मणाला, कां होईना हा मधुर • भाषणाचा गुण आपल्या अंगीं केवळ अपूर्व आहे. "