पान:अकबर १९०८.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
खंड ३ रें.

 विषय मजहून अधिक चांगले जाणत आहां मला आपली गविणिभाषा शिकण्यालाच, ती आमच्या फारशी आणि अरबी याहून अगदीं भिन्न असल्यामुळे अगोदर कितीतरी परिश्रम लागले. "
 सिद्धराम — मी स्वत: हिंदु : असूनही मला तरी गीर्वाणभाषा कोठें चांगली येत आहे. मला देखील फारशी भाषेचाच विशेष सहवास असल्यामुळें संस्कृत बरेंच कठीण गेलें. मला संस्कृत शिकवितांना गुरुजीस किती त्रास पडला तें त्यांना विचारा पाहिजे तर.
 कुल्लुक फैजीस उद्देशून ह्मणाला, प्रथमतः जरी आपणाला गीर्वाण भाषेचा अभ्यास फार कठीण गेला, तरी आतांचें आपलें तीमधील प्राविण्य कांहीं सामान्य नाहीं. आपला काश्मीरचा इतिहास आणि नलदमयंतीच्या कथेचा अनुवाद पाहून ही कोणा यवनग्रंथकाराची रचना आहे असें कोण ह्मणेल ? "
 संस्कृत साहित्याविषयीं फैजीचे मनांत फारच प्रेम वास करीत होतें. कुल्लुकानें त्याची प्रशंसा केल्यावर तो अधिकच उत्सुकतेनें ह्मणाला, अहाहा ! नलदमयंती आख्यान ! ! काय अपूर्व कविता ! त्याचा मी केलेला अनुवाद कितीका चांगला उतरलेला असेना. जें पदलालित्य, जो अर्थगौरव आणि जें ओज संस्कृतामध्यें आहे, तें कदापि अनुवादांत साधावयाचें नाहाँ. शिवाय तो कथाभाग तरी किती उपदेशपर ! दमयं- तीची धर्मपरायणता आणि अखंड पतिप्रेम ही केवळ लोकोत्तर होत. तिज- वर कितीही संकटें कोसळलीं, पतीनेंही तिचा त्याग केला, तथापि सत्य आणि पातिव्रत्य यांपासून तिनें आपलें पाऊल चळूं दिलें नाहीं. मी केवळ बादशहा सलामत यांच्या संतोषार्थ त्या कथेचा अनुवाद केला. त्यांना स्वत:ला कार्यबाहुल्यामुळे कठीण अशा विदेशी भाषा शिकण्याला फुरसत नसते. आणि जिज्ञासा तर सर्व गोष्टींची. आतां त्यांनीं मला 'इंजीलचा अनुवाद करण्याची आज्ञा केली आहे. "
 कुल्लुक — काय ? कशाचा अनुवाद ?
 फैजी- इंजील ह्मणून इसाई ( ख्रिस्ती ) लोकांचा पवित्र ग्रंथ आहे. या इसाई लोकांचा वृत्तांत आपणही कदाचित् ऐकला असेल. त्यांच्या प्रथांत अनेक गोष्टी वाचण्यालायक आहेत. मला त्यांत पुष्कळशा गोष्टी