पान:अकबर १९०८.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अकबर.

५१

 प्राप्त व्हावयाचा नाहीं. खरोखरच या प्रासादाच्या प्रत्यक्ष दर्शनानें कोणाही मनुष्याचें अंतःकरण आश्चर्यचकीत झाल्यावाचून रहावयाचें नाहीं, कुल्लु-- काकडे वळून, 'बरें तें असो. कसें काय कुल्लुकमहाशय सांप्रत आपल्या देशाची कशी काय हालहवाल आहे ? काश्मीराकडील वृत्तांत ऐकण्यावि- षयीं माझें मन नेहमीं अतिशय उत्सुक असतें.
 कुल्लुकानेंही फैजीची इच्छा जाणून काश्मीराकडील बहुतेक सर्व वर्त- मान सांगितलें. परंतु, तेथील राजवराण्यांत उत्पन्न झालेल्या विषमभावाचा एक लवलेशही आपल्या मुखावाटें बाहेर काढिला नाहीं. फैजीनें सिद्धरा-- मासही एक दोन प्रश्न विचारिले आणि त्यानेंही त्यांचीं रीतीप्रमाणें ठस-- विक उत्तरे दिलीं. याप्रमाणें गोष्टी होतां होतां पुढें विद्याविषयक चर्चा निघाली. फैजीचें मनमिळाऊपणाचें वर्तन पाहून कुमार सिद्धराम हाही. त्याजबरोबर अनेक गोष्टी मोकळ्या मनानें बोलूं लागला....br>  फैजी सिद्धरामास उदेशून ह्मणाला, एकूण आमचा राजप्रासाद तुम्हाला तुमच्या कल्पनेंहून अधिक उत्तम दिसला ह्मणतां ! मी जेव्हां तुह्मां हिंदुलोकांचे वेदशास्त्रादिकांचे ग्रंथ अवलोकन करूं लागलों तेव्हां. माझ्याही मनाची अशीच स्थिति झाली होती. आमच्या धर्माचे लोक कांहीं विशेष विद्वान् नाहींत. त्यांनीं तुमच्या ग्रंथांची निंदा करून मला अगदी खात्रीपूर्वक त्यांत कांहीं नाहीं ह्मणून सांगितलें होतें. ते ह्मणत: की, 'हिंदुलोकांच्या ग्रंथांत केवळ व्यर्थ कुरापती भरल्या असून त्यांच्या वाचनापासून आमच्या सभ्यतेस मात्र हानी पोचणारी आहे. तसेंच अल्ला. आणि रसूलिल्ला यांच्या दृष्टीनें तर ते ग्रंथ केवळ अविश्वासार्ह होत. या शेवटच्या गोष्टी संबंधानें मी तूर्त विशेष कांहीं बोलत नाहीं. परंतु, काव्या- लंकारांच्या आणि ज्ञानाच्या उन्नतिसंबंधानें पाहतां हिंदु ग्रंथकार आह्मां- हून पुष्कळच पुढें आहेत. हिंदु लोकांची वीररसप्रधान काव्य आणि शृंगाराविषयक काव्य यांच्या सौंदर्याची बरोबरी इतर भाषेतील ग्रंथ कधीही करू शकणार नाहींत. तुमच्या प्राचीन ऋषिप्रणीत ग्रंथांत जशी गंभीरता, शुद्धता आणि धर्मपरायणता दृष्टोत्पत्तीस येते, तशी दुसरीकडे कोठेही दिसावयाची नाहीं. वस्तुतः आपल्या सारख्या जवळ माझ्यासार-- ख्यानें या गोष्टीचें विशेष वर्णन करीत बसणें व्यर्थ आहे.. आपण हे सर्व