पान:अकबर १९०८.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड ३रें.

 सलाम घेतल्यावर ते तिघेही एका पडवीत अंथरलेल्या गालिच्यावर • बसले.
 * फैजी हा आपल्या भावापेक्षांही अधिक मनमिळाऊ असून सरळ अंतःकरणाचा आणि प्रसन्नवदन असा पुरुष होता. त्यानें जरी कित्येक वेळ समरभूमीवर जाऊन आपल्या वीरतेची साक्ष पटविली होती, तरी त्याहीपेक्षां त्याच्या अंगचे इतर गुण फारच वर्णनीय होते. त्याच्या दृष्टीं- तील गांभीर्यावरून तो मोठा दूरदर्शी आणि शांत स्वभावाचा पुरुष . अशी त्यास पहाणाराची खात्री होत असे. बादशहा सलामत त्यानें अनेकवेळां त्यास दूत बनवून परराष्ट्रांत वकिलीकरितां पाठविलें होतें, व त्यानेंही आपली कामगिरी उत्तमप्रकारें बजाविली होती.
 कुशल प्रश्न वगैरे झाल्यावर फैजीनें बोलण्यास सुरवात केली. तो ह्मणाला, आपण लवकर परत येऊन आह्मांस आपल्या पुनर्दर्शनाचा लाभ बाल अशी माझी खात्रीच होती. आपल्या शिष्यास पाहून मी मोठा प्रसन्न झालों आहे. सिद्धरामाकडे वळून 'कसें काय ? आपण आमच्या शहराची शोभा वगैरे पाहिली कीं नाहीं ?,
 सिद्धराम - जी हां ! आपले जिरंजीव पर्विज यांनी मोठ्या प्रेमानें मला आज सकाळी आपल्या राजवाड्याचा कांहीं भाग दाखविला. खरें झटलें असतां तेवढ्यानें मीं कांहीं पाहिलें असें होत नाहीं. येथील कारा- गिरी आणि कलाचातुर्य पाहून, माझें तर मन अगदीं थक्क होऊन गेलें. खरोखर माझ्या अनुमानापेक्षांही जास्त अशा कित्येक गोष्टी माझ्या दृष्टीस पडल्या. फैजी—आपले ह्मणणें यथार्थ आहे. प्रथमतःच येथे येणाऱ्या मनुष्याला असेंच होत असतें. येथील आमच्या राजप्रासादाचें कोणी कितीही कां वर्णन ऐकलेलें असेना, त्याला प्रत्यक्ष दर्शनापासून होणारा आनंद कधींही
 * फैजी हा अबुलफजलचा वडील भाऊ होता. तो उत्तम कवी असून त्यावर अकबराची प्यारमर्जी असल्यामुळे त्यानें त्यास ' कविशिरोमणी अशी पदवी दिली होती. कादंबरीकारानें फैजीस अबुलफजलचा धाकटा भाऊ बनविलें आहे तें चुकीचें होय.