पान:अकबर १९०८.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

४९

 जाऊं. कारण, ऊन्हही कडक झालें आहे आणि मलाही किंचित् थकवा आल्यासारखा वाटत आहे. "
 सिद्धराम - चला तर मग. आज आपण माझ्याकरितां फार परिश्रम घेतले, याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहें.
 याप्रमाणें भाषण झाल्यावर ते दोघे तेथून निघाले. पर्विज सिद्धरा- मास पोचविण्याकरितां त्याजबरोबर घरापर्यंत आला. सिद्धरामाचा निरोप घेऊन परत जातेवेळीं तो त्यास ह्मणाला, “ उदईक कदाचित् आपणाला आपल्या सेनाकार्यामध्यें व्यग्र रहावें लागेल. अतएव नगर पहावयास येण्यास आपणाला सवड होणार नाहीं. करितां परवां अगर आणखी एखादे दिवशीं जेव्हां आपणांस सोईचें पडेल तेव्हां आपण नगराची अव- शिष्ट शोभा पहाण्यास जाऊं. "
 सिद्धराम - ठीक आहे. आपण पुन्हां माझे बरोबर येऊन नगरशोभा दाखविण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली, या आपल्या कृपेबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहें. ज्या दिवशीं मला सवड असेल त्या दिवशीं मीच स्वतः आपलें घरीं येईन. नंतर आपण दोघे मिळून आजच्या प्रमाणेंच सहलीस जाऊं.
 इतकें भाषण झाल्यावर पर्विज आपल्या घराकडे चालता झाला आणि सिद्धराम आपल्या रहावयाच्या जागेंत जाऊन वाटेच्या श्रमांचा परिहार करण्याकरितां विश्रांति घेत पडला. सायंकाळीं सिद्धराम आणि कुल्लुक दोघे मिळून अबुल फजलचा भाऊ फैजी याचे भेटीस गेले. फैजी याचे निवासस्थान एका अत्यंत रमणीय अशा वाटिकेंत होतें. ती वाटिका सद उत्तम फलदायक आणि सुवासिक पुष्पांनी युक्त अशा सघन वृक्षांनीं भरलेली असे. हे दोघे तेथें जातांच एका सेवकानें आंत जाऊन फैजीस त्यांच्या आगमनाची वर्दी देऊन त्याच्या आज्ञेनुरूप तो त्यांना आंत नेण्याकरितां पुन्हां बाहेर आला. आंत गेल्यावर सिद्धरामानें पाहिलें तों एका लहानशा दिवाणखान्यांत उत्तमप्रकारची बैठक घातलेली असून तीवर बसून कांहीं कागदपत्र पहात असलेला एक तरुण पुरुष त्याचे दृष्टीस पडला. त्यास पाहतांच सिद्धराम आणि कुल्लुक यांनी त्यास लवून सलाम केले. तेव्हां त्यानेंही मोठ्या गौरवाने मोठ्या उत्थापन पूर्वक त्यांचे