पान:अकबर १९०८.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

૪૮

खंड ३ रें

.

 पर्विजनें उत्तर दिलें, “ हे सर्व साहित्य बादशहा सलामत यांनी केवळ स्वतांकरितांच जमविलें आहे असें नाहीं. त्यांचा स्वभाव अगदीं साधा आहे. त्यांचा पिता हुमायून बादशहा राज्यभ्रष्ट होऊन देशाटन करीत असतां त्या प्रवासांत एका भयाण जंगलांत त्यांचा जन्म झाला असल्या- मुळे ती स्थिति मनांत स्मरून बादशहा सलामत आपलें प्रस्तुतचें संपूर्ण राजैश्वर्य केवळ तुच्छ समजत असतात. परंतु, ते सांप्रत ज्या प्रदेशाचें राज्य करीत आहेत, त्या प्रदेशांतील लोकांच्या अभिरुचीस अनुसरून त्यांचें वर्तन असलें पाहिजे. ही गोष्ट त्यांचें लक्षांत आहे. राज्य संरक्षणार्थ प्रचंड सैन्य आणि बुद्धिमान व राजनीतिज्ञ पुरुष यांशिवायही कित्येक गोष्टींची अवश्यकता असते. शिवाय आपले हिंदुलोक, आमचें फारशी, मोगल आणि आरबनिवासी या सर्वांचा सामान्यतः असा समज आहे कीं, ज्या बादशहाजवळ बाहेरचा डामडौल आणि थाटमाट यांचें अव- डंबर असेल तो बादशहा उत्तम व त्यासच ते जास्त मान देतात. असें जरी आहे तरी या अवडंबरामुळे व्यर्थ द्रव्याचा व्यय होत असेल असें मात्र आपण समजूं नका. एवढी मोठी घडामोड या स्थलीं चालूं असतां, एकादी वस्तू गहाळ होणें किंवा एकाद्या कामांत विनाकारण अधिक खर्च होणें याठिकाणीं संभवत नाहीं. ज्याप्रमाणे येथील दरबारांत बादशाही आज्ञेचें दृढ प्रतिपालन होत असतें, त्याचप्रमाणे राज्याच्या इतर भागां- तही होतें. खरोखर बुद्धिमान् राजाचा राज्यप्रबंध कसा असतो याचें प्रस्तुतचें राज्य हैं एक उदाहरण आहे. आमचे वडील या सांप्रतच्या राज्य प्रबंधावर “ आइने अकबरी " नांवाचा एक ग्रंथ लिहीत आहेत. त्यांत ते प्रस्तुतच्या बारीकसारीक परंतु, महत्वाच्या सर्व गोष्टींचा उल्लेख करणार आहेत. अशाही कित्येक थोड्या गोष्टी आहेत की, ज्याबद्दल कित्येक असमंजस लोक बादशहा सलामत यांना अपव्ययी समजतात. उदाहरणार्थ दीनदुःखी लोकांना मदत करणें आणि विद्वान व शिल्पी लोकांना उत्तेजनार्थ द्रव्य देणें या गोष्टी जेव्हां बादशहा सलामत सढळ हातानें करूं लागतात, तेव्हां बिचारे खजान जीसाहेब द्रव्य देतां देतां अगदीं टेकीस येतात. "
 इतकें बोलून पर्विज सिद्धरामास ह्मणाला, चला आतां आपण परत