पान:अकबर १९०८.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

४७

आहेत. परंतु, तीं बगसची स्थान असल्यामुळे आपल्यास तिकडे जातां यावयाचे नाहीं. तीं स्थानें तयार झाल्यावर एक वेळच माझे दृष्टीस पडली होतीं ". इतकें बोलून तो मार्गदर्शकास म्हणाला, थारला दिवा- खाना उघडला आहे काय ? " तो म्हणाला, जी हुजूर, अजून तो उवडला नाही. परंतु, आतां थोडक्यांच दिवसांत तो उघडला जाईल. "
 पर्विज - कांहीं चिंता नाहीं.. थोड्या दिवसांनीं त्यास्थलीं एक महासभा भरावयाची आहे. त्या दिवशीं तो सहजच आमच्या दृष्टीस पडेल. तसेंच बादशहा सलामत यांचे दिवाणखाने वगैरे आमच्या पाहुण्यांना आपोआप दृष्टीस पडावयाचे आहेत.
 वर वर्णन केलेल्या थोरल्या दालनांतून निघून ते दुसऱ्या बाजूस वळले. त्या ठिकाणी कित्येक नौकरचाकर आणि शिपाईप्यादे आपआ- पल्या कामांत निमग्न असलेले दृष्टीस पडले. पर्विजनें तेथील आजूबा- जूंच्या कित्येक स्थलांचें वर्णन करून सिद्धरामास त्यांची माहिती करून दिली. नंतर त्यांनी तेथील राजकीय सरस्वतीभुवन पाहिलें त्या स्थली एकाहून एक सुंदर हस्तलिखित पुस्तकें उत्तम बांधणी करून संरक्षित केलेलीं होती. तेथून फिरतां फिरतां ते सोनार, जव्हेरी, गंधी यांची स्थानें, तसेंच भांडार आणि पाकशाला, शस्त्रशाला, अश्वशाला, गजशाला इत्या- दिकांची शोभा पहात असतां कुमार सिद्धराम अगदीं आश्चर्यचकित होऊन गेला.
 सिद्धरामास वाटलें होतें कीं, राजवाड्याचा बहुतेक भाग पाहून झाला. परंतु, तो त्याचा समज चुकीचा होता. त्यानें जेव्हां पशुशाला अवलो- कन केली तेव्हां अद्याप आपण कांहींच पाहिलें नाहीं असें त्यांस वाटलें.. तेथील पशुशाला म्हणजे एक मोठाथोरला गांवच होता. कुमार सिद्धराम अत्यंत आश्चर्ययुक्त होऊन ह्मणाला, मला वाटतें येथें असलेल्या पशूंची गणना देखील करितां यावयाची नाहीं. "
 पर्विज—यांत काय संशय. या शाळेत नुसते पांच हजार हत्तीच आहेत मग इतर जनावरांची गणना कोठून होणार
 सिद्धराम - परंतु केवळ एका व्यक्तीच्या जिवाकरितांच येवढें अवडंबर ना ?