पान:अकबर १९०८.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
खड ३ र.

त्यांना एक मोठें थोरलें मैदान लागलें. या मैदानांतील सर्व सडका दुतर्फा घनदाट वृक्षांनीं सुशोभित केलेल्या होत्या. त्यांतील मुख्य सङका सहा असून त्या प्रत्येकीच्या शेवटीं वर वर्णन केल्याप्रमाणें एक एक मेहरपदार दरवाजा होता. मध्यभागी एक मोठा थोरला पाषाण- निर्मित हत्ती उभा असून त्याच्या बळवून वर केलेल्या सोंडेतून कारंजाप्र- मार्णे पाण्याचें फवार सुटत होते. या स्थानाच्या तीन बाजूंस संगमरवरी दगडाचे खांब उभे असून त्याच्या मार्गे स्वच्छ आणि सुंदर गृहांची शोभा दृष्टीस पडत होती. यद्यपि येथील शोमा नदीतटाकावरील शोभेची बरो- बरी करूं शकत नव्हती तथापि राजमहालाचा प्रचंड विस्तार आणि. ठिकठिकाणी दिसणारे किल्ल्याचे घुमट व गृहांचा समुदाय यांच्या योगाने तेथील एकंदर दृश्य मोठें मनोरम झालें होतें.
 पर्विज - येथील सर्व स्थानांचे निरीक्षण एक दिवसांत होणें अशक्य आहे. फिरता फिरतां आपण जरी थकलों नाहीं, तरीपण आपणांस इतका वेळ तरी कुठे आहे ? तथापि आजच्या सहलीत आपण सर्व गोष्टी उडत उडतच पाहून घेऊ. पुढें आपणांला येथें रहावयाचें आहेच तेव्हां प्रसंगाप्रसंगाने आपणांस प्रत्येक स्थान यथास्थित पहावयास सांपडेल.
 राजवाड्याच्या दरवाज्यापाशीं जातांच पर्विजनें द्वारपालास बोलावून त्याचे कडून एक मार्गदर्शक घेतला. तेव्हां त्या मार्गदर्शकानें त्यांना दाखवि- ण्यायोग्य असलेली सर्व स्थानें दाखविलीं. प्रथमतः ते त्याच्या बरोबर एका मोठ्या प्रशस्त दालनांत गेले. तेथें एकापेक्षां एक उत्तम उत्तम दिवाणखाने. देशी रिवाजाप्रमाणे बनविलेले होते. त्याच्या पलीकडे एक अत्यंत सुंदर उद्यान असून त्यांत नानाप्रकारचे पुष्पवृक्ष आणि पुष्पलता लाविलेल्या होत्या. मधून मधून थुईथुई उडणारी कारंजी बागेची शोभा दुणावीत होतीं... शुभ्र संगमरवरी पाषाणांच्या भिंतींत अनेक रंगांच्या दगडांचें जडाऊ काम करून त्यांत नानाप्रकारच्या वेलबुट्टी दाखविल्या होत्या. कारंजांतून उडणारे पाण्याचें तुषार वातावरण शीतल करीत होते.
 ठिकठिकाणीं जरी- च्या काशियाचे रेशमी पडदे सोडिले असून दिवाणखान्याच्या जमिनीवर मोठमोठाल्या उंची सतरंज्या आणि गालिचे हंतरलेले होते.
पर्विज — “

याच्या पलिकडच्या बाजूस याहीपेक्षां प्रेक्षणीय स्थानें