पान:अकबर १९०८.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.
४५

 नंतर सिद्धराम आणि पर्विज तेथून उठून चालते झाले. ते कांहींसें पुढे गेल्यावर पर्विज म्हणाला, “ दैवयोगानें आज कांहीं विशेष कडक ऊन्ह पडलें नाहीं. चला आपण पायींच जाऊं आणि प्रथमतः आग्रा शहरांत सर्वांत उत्तम आणि पहाण्यास योग्य असलेलें “ शाहमिहाल नांवाचें स्थान पाहूं. कसें काय ? पायीं जाण्यानें आपणांस फारशी तख- लिफ तर नाहींना होणार ? "
 सिद्धरामानें मनमिळाऊपणानें झटलें, कांहीं हरकत नाहीं. मी शीतोष्णाची विशेष पर्वा करीत नाहीं. कारण कीं, आमच्या पर्वतीय प्रदेशांत बहुधा सर्वांनाच शीतोष्ण सहन करण्याची संवय असते आणि जरी तें स्थान दूर असले तरीही कांहीं हरकत नाहीं. आपणांला मात्र आमच्याकरितां व्यर्थ श्रम घ्यावे लागत आहेत, याबद्दल क्षमा असावी. कारण कीं, आपण येथील सर्व स्थानें बहुधा अनेकवेळा पाहिलींच असतील. "
 पर्विज हंसून ह्मणाला, "नाहीं, नाहीं, जरी मला आपल्यासारखा शीतोष्ण सहन करण्याचा अभ्यास नाहीं तरी थोडेबहुत चालण्यानें किंवा ऊन्ह अंगावर घेण्यानें आह्मांला ह्मणजे विशेष तखलिफ होईल असें नाहीं आणि त्यांतूनही थोडेसें ऊन्ह जरी लागलें तरी तें आपल्या सहवासांत असल्यामुळे होणाऱ्या आनंदांत समजावयाचें देखील नाहीं. "
 याप्रमाणें इकडच्यातिकडच्या गोष्टी बोलतां बोलतां त्यांचें मन एक- मेकांशी इतकें मिळून गेलें कीं, पुढें क्रमाक्रमानें तें एकमेकांशी एकमे- कांच्या मनांतील गुह्य गोष्टीही बोलं लागले. पर्विज झणाला, मला सेनाविभागामध्यें काम करण्याची अभिरुचि नाहीं. आमचे बाबाही मला याकामी अयोग्य समजत असून मला दुसऱ्या एकाद्या खात्यांत घाल- ण्याची त्यांची इच्छा आहे. '
 याप्रमाणें गोष्टी बोलत चालतां चालतां ते दोघे एका मोठ्या रुंद रस्त्यावर येऊन पोहोंचले. हा रस्ता म्हणजे प्रासादाकडे जाण्याचा मुख्य मार्ग होता. या सडकेच्या अंती एक फार मोठा मेहरपदार दरवाजा होता. अंबारीसह उंच हत्ती त्यांतून सहज निघून जाईल इतकी त्याची उंची होती. या दरवाजाच्या आंत गेल्यावर