पान:अकबर १९०८.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४

खंड ३ रें.

ल्या सेवकांस हांक मारिली व तो त्यास ह्मणाला, 'पहा बरें, पर्विज घरांत आहे कीं नाहीं ? '
 सेवक — जी हुजूर, सेवकानें त्यांना आतांच आंतमध्ये फिरतांना पाहिलें.
अबुल फजल - अच्छा ! त्याला बोलावून आण.सेवक -- जसा हुकूम.
 कांहीं वेळानें सिद्धरामाच्याच वयाचा एक तरुण तेथें आला. त्याच्या अंगावरील वस्त्रे अत्यंत मूल्यवान् होतीं आणि त्याचे गळ्यांत एक बहु- मोल हिन्यामोत्यांची कंठी होती. तेथें येतांच तो मोठ्या विनीतभावानें अबुलफजलास सलाम करून उभा राहिला. त्यावेळीं त्याचें मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न असें दिसत होतें.
 अबुलफजल त्यास ह्मणाला “पर्विज जे काश्मीराहून येणार आहेत ह्मणून मी एकेवेळीं तुला झटलें होतें, तेच हे दोघे सद्गृहस्थ. कुमार सिद्धराम तुझ्या मैत्रीला योग्य आहे. आज याला तूं आपल्या बरोबर घेऊन आपल्या शहराची सर्व शोभा दाखीव. हा आज प्रथमच या शहरी आलेला आहे.
 पर्विज - मोठ्या आनंदानें, मी तर याच्यांत मोठी थोरवी आणि सन्मान समजतों.

 कुल्लुक सिद्धरामात ह्मणाला वत्स, तूं पर्विजबरोबर जाऊन नगरशोभा अवलोकन कर. तूं परत येईपर्यंत मी येथेच थांबतों. मला मंत्रीमहाशन यांचे बरोबर कांहीं विशिष्ट गोष्टींच्या संबंधानें संभाषण करावयाचे आहे.
 सिद्धराम - जशी गुरुजींची आज्ञा.
८८  याप्रमाणे भाषण होऊन सिद्धराम तेथून जावयास निघाला असतां अबुलफजल त्यास झणाला, तुमाला आजच माझे धाकटे बंधू फैजी यांचे भेटीस जावयाचें आहे. ही गोष्ट उद्यांवर टाकूं नका. नाहींतर ते कदाचित् रागावतील. करितां गुरुजीसहवर्तमान तुह्मी आज तिकडे जाण्याचें करा. समजलांत ? "
 सिद्धराम -- जशी आज्ञा.
4