पान:अकबर १९०८.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अकबर.

४३

त्यांच्याच पैकी कोणीतरी त्यांचा सेनापति असल्याशिवाय प्रसन्न रहात नाहींत. अन्यजातीचा सेनानी त्यांच्यावर नियुक्त केल्यास ते कधीही त्याच्याशी प्रसन्न चित्तानें वागत नाहींत. अशा स्थितीत सिद्धरामासारख्या माझ्या प्राचीन आणि विश्वासपात्र मित्राच्या पुत्रास बोलावून त्यास: अशा एखाद्या पदावर नियुक्त करणें मला अधिक श्रेयस्कर नाहीं काय ?. त्याच्या पित्याचीही इच्छा त्यास. बादशाही दरबारांत एखादें उच्चः पद मिळावे अशी आहे, तेव्हां यांत आम्हां उभयतांचेही हेतु सिद्धीस. जात असल्यामुळे मला मोठा संतोष वाटत आहे.
 सिद्धरामानें अत्यंत विनयपूर्वक उत्तर दिलें कीं, ' असें जरी आहे. तरी हे आपल्या कृपेचेंच फळ आहे आणि याबद्दल मी मोठ्या कृतज्ञ अंतःकरणानें खुद्द मजकडून आणि पिताजींकडूनही आपणांस धन्यवाद देतों आणि आशा करितों कीं, ज्याअर्थी आपण मजवर एवढी कृपा केली आहे त्याअर्थी मीही आपल्या अधिकाराच्या कामाचा उत्तमप्रकारें निभाव लावीन.

 अबुल फजलनें गंभीरभावानें झटलें, पहा, सत्य आणि धर्म हे सर्व श्रेष्ठ आहेत. वस्तुत: तुला अशा प्रकारचा उपदेश करण्याची अवश्यकता: दिसत नाहीं. तथापि, कांहीं दिवसपर्यंत येथें वास्तव्य केल्यावर तुला: स्वत:लाच कळून येईल कीं, छल, कपट आणि विश्वासघात या गोष्टी तर येथें प्रत्येक कोनांत आणि सांधींत दबा धरून बसल्या असून, कधीं कधीं अत्यंत धामिर्के लोक देखील त्यांच्या जाळ्यांत सांपडून दुष्कर्म.. करण्यास प्रवृत्त होतात. उदईक तुझे सेनापति तुला तुझ्या कामाची माहिती देतील आणि रजपूत लोकांशी अत्यंत सावधगिरीने राहण्यावि-- षयीं तुला सूचना देतील. याचे कारण तुला ठाऊकच आहे की, त्यांपैकी अनेक लोक वंशमर्यादेनें तुझ्याहून यत्किंचितही कमी नसतां तुझ्याहून खालच्या पदावर नियुक्त झालेले आहेत. अतएव तं त्यांना सामान्य शिपाई समजून त्यांचे बरोबर कमी दर्जाचे वर्तन करू नकोस. " नंतर तो कुल्लुका- कडे वळून त्यास म्हणाला, 'आज. यांना आमचें शहर दाखवा. हे त्याचें भाषण झाल्यावर कुल्लुक आणि सिद्धराम तेथून जाण्याकरितां उठण्याच्या बेतांत होते. इतक्यांत अबुलफजलनें त्यांस जरा थांबा असे हृणुन आप-