पान:अकबर १९०८.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२

खंड ३ रें.

 अबुल फजल यास पाहतांच सिद्धराम आणि कुल्लुक यांनीं त्यास मोठ्या आदरानें उत्पादनपूर्वक सलाम केले. त्यानेंही त्यांस उलट सलाम करून झटलें, - आपण फार लोकर परत आलांत हें पाहून मला मोठा संतोष होत आहे. मला वाटतें कुमार महाशय सिद्धराम बादशहा सला- • मत यांच्या सेवेंत प्रविष्ट होण्याविषयीं फार उत्सुक झाला असेल.
" -  कुल्लुक — यांत काय संशय. आपली इतकी कृपा आणि बादशहा सलामत यांची इतकी अनुग्रहदृष्टी जर याजवर आहे तर आह्मी परत येण्यास विलंब करणें अत्यंत अनुचित नाहीं काय ? "
' अबुल फजल - छे छे ! कृपा कशाची ! याचें त्या पदावर आरूढ होणें उचितच आहे. आह्मी असें पहातों कीं केवळ स्वजातीय लोकांनाच राज्यांतील संपूर्ण उच्च पदांचा अधिकार देणें उचित नाहीं; तर कित्येक उच्चपदांचे अधिकार ज्या हिंदु लोकांशी आमचा दृढ संबंध आहे त्यांनाही दिले पाहिजेत. शिवाय तुझी पहातच आहां कीं, आमचे रजपूतभाई
 या वर्षी ह्मणजे त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी बादशाही दरबारांत प्रवेश झाला. अबुल फजल हा चांगलाच गुणवान् असल्यामुळे त्यावर बादशहाची सजी बसली आणि त्याची योग्यता प्रतिवर्षी अधिकाधिक वाढत गेली. शेवटी तो शहान्शहा अकबर याचा वजीर आणि चार हजा- `रांचा मनसबदार झाला. अबुलफजलनें आपल्या हुद्याचे काम फार सुयो- • ग्यपणें आणि सफलतापूर्वक निभावलें. आपल्या पित्याप्रमाणेंच हे दोघे बंधु स्वतंत्र आणि उदार विचाराचे पुरुष होते. ते आपले विचार मनांतले मनांत न ठेवितां ते आचरणांत आणून त्यांचा अनुभव घेन. यामुळें. त्यावेळचे कट्टे सलमान लोक त्यांना विधर्मी आणि आजाद " ह्मणत. फक्त बादशहास मात्र त्यांचे विचार पसंत पडत असे दोन ग्रंथ रचिले आहेत. अबुलफजल ३० सन १६०२ च्या आगष्ट महिन्याच्या १२ व्या नारखेस मारला गेला. यानें " आइने अकबरी ” आणि अकबरनामा ” अकबरनामा या ग्रंथांत त्यानें इ० सन १६०२ पर्यंत अकबराच्या राज्याचा सविस्तर इतिहास दिला आहे. अबुलफजल यास संस्कृतभाषाही फार चांगल्यारीतीनें अवगत झालेली होती.