पान:अकबर १९०८.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

४१

वजीर अबुल फजल याच्या घरीं आपणांला गेलें पाहिजे. आपण स्नानें वगैरे आटपूं तोंपर्यंत वत्स गाठोडीं उतरून आणून आपणांकरितां वस्त्रे तयार करून ठेवील..
 सुमारें एक तासानंतर दोघेही वजिराच्या भेटीस जाण्याकरितां तयार झाले. सिद्धरामाच्या अंगावर एक जरीचा चोगा असून तो पायाच्या घोट्यापर्यंत लोंबत होता. त्याचे गळ्यांत एक सुंदर मोत्यांची कंठी होती.. मस्तकावर सुंदर रंगाचें उंची पागोटें असून त्यावर समोरचे बाजूस एक बहुमोल हिरा लाबिला होता. कुल्लुकानेंही आपल्या योग्यतेनुरूप चांगला भडकदार पोषाख धारण केला आणि दोघेही आपापल्या घोड्यांवर आरूढ होऊन घराबाहेर निघाले.
 तथून वजिराचें घर फारसें दूर नव्हतें. द्वारासंनिध पोहोचतांच तेथील द्वारपालानें त्यांना जवळच्या दिवाणखान्यांत बसावयास सांगून तो स्वतः त्यांच्या येण्याची वर्दी देण्याकरिता आंत गेला. थोड्याच वेळांत दरश-- ज्यास असलेला पडदा दूर करून आंतून अबुलफजलनें जेथें कुल्लुक आणि सिद्धराम हे दोघे बसले होते तेथें प्रवेश केला. मंत्री अबुलफजल, हा शरीरानें किंचित् स्थूल असून मध्यमचणीचा मनुष्य होता. त्याची उमर पन्नास वर्षांची होती. त्यानें एक पिवळें बुट्टीदार बहुमूल्य रेशमी वस्त्र परिधान केलें होतें. त्याला दाढी नव्हती. यद्यपि त्याचें वयोमान 'अर्धेअधिक झालें होतें. तथापि, त्याचें मुख प्रसश्न असून त्यावर चित्ताची दृढता आणि शरीरबल हीं स्पष्टपणें प्रतीत होत होतीं. *
 * अबुलफजलच्या पित्याचें नांव शेखमुबारक. ह्याचा आजा शेख - खिदर नामक सिंधवा रहिवासी होता. मुबारक हा आपल्या काळचा एक अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारी पुरुष होता. त्याचा द्वितीयपुत्र अबुलफजल हा होय. याचें जन्म तारीख १४ जानेवारी सन १५५१ इ. रोजी झालें. विद्योपार्जनाचें कामी त्यानें अत्यंत परिश्रम केले असून त्यावेळीं उपलब्ध असलेल्या उत्तमोत्तम ग्रंथांचेंही अवलोकन केलें होतें. त्याचा वडील भाऊ फैजी यानें आपल्या वयाच्या बाराच्या वर्षी बादशाही दरबारांत प्रवेश केला आणि पुढे त्याच्याच द्वारें अबुलफजलचाही इसवी सन १९६८