पान:अकबर १९०८.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
खंड ३ रें.

मुळे फारच सुंदर दिसत होते व त्यावरून सूर्यकिरणांचें परावर्तन होऊन प्रेक्षकांच्या नेत्रांस दिपवून टाकीत होते. त्या प्रासादाच्या चारी बाजूंस क्रीडास्थानें आणि अमात्यभवनें सुशोभित होतीं. त्याशिवाय आणखीही कित्येक श्रीमान् नागरिकांची घरें आणि उंच उंच मनोरे आपलीं शिरें उंच करून नगराची शोभा द्विगुणित करीत होते.
 याप्रमाणें नगराचें सौंदर्य अवलोकन करून आमच्या प्रवाशांनीं आपले घोडे थोपविले आणि अत्यंत प्रसन्न चित्तानें ती शोभा अवलोकन कर- पयांतच त्यांनीं तेथें कांहीं काळ घालविला. त्यावेळीं कुमार सिद्धराम आपल्या मनाशीच विचार करूं लागला कीं, “ काय ईश्वरी लीला आहे पहा ! कीं, केवळ एकाच व्यक्तीनें आपलें बाहुबल आणि बुद्धिबल यांच्या प्रतापानें हैं अखंड राज्य स्थिर केलें आहे आणि या अपूर्व शोभेचा विस्तार करून ठेविला आहे. जर प्रभूची इच्छा असेल तर लौकरच मला त्या महानुभाव व्यक्तीचें प्रत्यक्ष दर्शन होईल आणि त्याजबरोबर माझ्या गोष्टीहि होतील ! मग दुसरें कांहीं कां होईना ? ”
 नदी उतरून पलीकडचे तीरीं गेल्यावर सिद्धराम आणि कुल्लुक यांनी बरोबर आलेल्या सेनापतीचा निरोप घेऊन दुसरा मार्ग स्वीकारिला आणि आपल्या सेवकांसहित कुल्लुकाच्या एका मित्रानें पूर्वीच ठरवून ठेविलेल्या एका गृहांत जाऊन ते उतरले. तें घर अत्यंत स्वच्छ आणि सुशोभित असून आवश्यक वस्तूंनीं भरलेलें होतें. त्याच्या समीप एक छोटेसें उद्यान असून सन्मुखच श्रीयमुनाजीचें चंचल तरंगयुक्त पात्र भक्तजनांच्या हृदयांत आनंदोर्मी उत्पन्न करीत होतें
.

 कांहीं कालपर्यंत विश्रांती घेऊन वाटेच्या श्रमाचा परिहार केल्यावर कुल्लुक सिद्धरामास ह्मणाला, चला आतां व्यर्थ कालक्षेप करितां कामा नये. आपलें सर्व उंट येऊन पोहोचले. आतां वस्त्रं भूषणें परिधान करून मध्यभागी एक दिवाणखाना बहात्तर फूट लांब आणि एकाहत्तर फूट रुंद असा बनविलेला असून त्याच्या दोहोंबाजूस दोन मोठमोठी दालने आहेत. या दिवाणखान्याचा घाट अगदीं हिंदूपद्धतीचा आहे, अर्थात् त्याला मुस- लमानी तऱ्हेच्या मेहरपी वगैरे नसून साधें छत पाटविलें आहे.