पान:अकबर १९०८.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

३९

निपुणिका आणि कमला यांनीं तिची किती तरी समजूत केली, कितीतरी धीराच्या गोष्टी सांगितल्या तथापि कोणत्याही उपायानें इरावतीच्या मनाला धीर ह्मणून आला नाहीं. इकडे कांहीं वेळानंतर सिद्धराम मार्गांत गोष्टी बोलत जात असलेल्या कुल्लुक आणि सल्हाण यांस येऊन मिळाला. नंतर सल्हाणानें आपल्या पाहुण्यांचा निरोप घेतला. तेवेळीं तो सिद्धुरामास ह्मणाला, “ कदाचित् तुमची व माझी पुन्हा लवकरच भेट होईल. कारण, थोड्याच दिवसांनीं माझीही आग्रयास येण्याची मनीषा आहे.. " इतके बोलून सल्हापण मागें प्रयागाकडे वळला आणि कुल्लुका- सह कुमार सिद्धरामही सेनेसहीत आग्र्याकडे चालूं लागला.
 वाट चालतां चालतां आणि उन्हाची पर्वा न करितां वाटेंतील खडतर संकटें सोशीत सोशीत आमचे प्रवासी कांहीं दिवसांनंतर एकेदिवशीं संध्याकाळी आग्र्यापासून थोड्या अंतरावर जाऊन पोचले आणि त्याठि- काणी रात्रीची रात्र मुक्काम करून दुसरे दिवशीं प्रभातकाळीं त्या प्रसिद्ध नगराच्या अगदीं सन्मुख आले. यमुनेच्या अपरतीरावरूनच नगराची शोभा पाहून कुमाराचें चित्त अत्यंत हर्षभरीत झालें आणि तेणेंकरून मार्गांतील संपूर्ण परिश्रमांचा त्यास एकदम विसर पडला.
 कुमारानें पाहिलें तों यमुनेच्या किनाऱ्यावर कोठें उद्यानें, कोठें किल्ल्याचे तट, कोठें राजमहाल आणि कोठें कोठें एकसारख्या मशीदींच्या रांगा अर्धवर्तुलाकार उभ्या आहेत असें त्याच्या दृष्टीं पडलें. त्यावेळीं जें ऐक- यांत येत होतें कीं, ( अकबराबाद ) आम्यासारखें नगर अखिल भरत- खंडांत दुसरें नाहीं, तें त्याच्या बाहेरच्या शोभेनेंच सत्य भासत होतें. त्याच्या मध्यभागी असलेला बादशहा सलामत याचा राजप्रासाद सर्वोत उंच असून जणूं अहंकारानें डोके वर करून उभा आहे व भोवतालच्या संपूर्ण भवनराजीवर आपलें अधिपत्य चालवीत आहे असें वाटत होतें. *त्याचे अनेक प्रचंड आणि उन्नत घुमट स्वर्णमय कलशांनी युक्त असल्या-
 * आग्र्याच्या किल्ल्यांतील हा अकबर बादशहाचा महाल समग्र लाल रंगाच्या पाषाणांनी बनविलेला आहे. हें स्थान चौकोनी असून त्याची लांबी दोनशेंसाठ फूट आणि रुंदी दोनशेंएकुणपन्नास फूट आहे. त्याचे