पान:अकबर १९०८.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
खंड ३ रें. ३

सल्हाण हे तयार होऊन येण्याच्या पूर्वीच त्यांची मार्गप्रतीक्षा करीत उभा राहिला. इतक्यांत ते दोघेही कुमारापाशीं आले. सल्हाणाच्या आज्ञेनें घोडेस्वार पुढे चालूं लागले आणि थोडक्याच वेळांत कुमार आणि कुल्लुक सल्हाणाची परवानगी घेऊन आपला मार्ग क्रसूं लागले. सल्हाणही कांहीं कालपर्यंत त्यांचेबरोबर त्यांना पोचविण्यास ह्मणून चालला होता. तेवेळीं कुल्लुक आणि सल्हाण यांनी आपले घोडे थोडेसें पुढें काढिलेले पाहून, कुमार सिद्धरामानें आपला घोडा किंचित् मार्गे किल्ल्या- कडे वळविला. त्याचे मनांत एकदां परत जातेवेळीं इरावतीचें दर्शन घ्याव- याचें होतें. इकडे इरावतीही मोठ्या पहाटे उठून सिद्धरामाच्या आगम- नाची वाटच पहात होती. कारण जातेवेळीं सिद्धराम उभ्या उभ्या तरी आपली भेट घेतल्यावांचून जाणार नाहीं अशी तिची खात्री होती. वर लिहिल्याप्रमाणें सिर्द्धराम किल्ल्याकडे येत असलेला पाहून इरावतीचें हृदय धडधड करूं लागलें. कुमारानें किल्याचे तटाखालीं येऊन तेथूनच वरती सज्जांत बसलेल्या इरावतीकडे अवलोकन करून आग्र्यास जाण्याविषयीं तिची परवानगी मागितली. तेव्हां इरावतीनें आपली प्रेमाची भेट ह्मणून मोठ्या परिश्रमानें तयार केलेला हातरुमाल त्यास अर्पण केला. त्यावरील कशियांत पुढील श्लोकाच्या अर्थाचं पालोपद तिनें काढिलें होतें.

॥ लावूनियां प्रीति-लतेस जातां ॥
॥ जावें सुखें मी न करीन चिंता ॥
॥ शुद्धी तिच्या सस्वर सिंचनाची ॥
॥ ठेवा, न ती जाउ सुकून साची ॥ १ ॥

इरावतीनें वरून खालीं टाकिलेला तो रुमाल सिद्धरामानें बरचीच्या टोंका- वर झेलन घेतला. तेव्हां त्याजवरील पालोपद वांचून त्याचे डोळे अश्रु- जलानें भरून आले. तथापि तो त्या स्थळीं फार वेळ न राहतां रुमाल. हृदयाशी धरून प्रेमपूर्ण अशा नेत्रांनी इरावतीच्या मुखकमलाकडे पहात पहात केवळ नेत्र संकेतानेंच तिचा निरोप घेऊन तेथून चालता झाला. इरावती दीर्घकालपर्यंत त्या स्थळीं उभी राहून त्याच्या गमनमार्गाकडे एकसारखी टक लावून पहात होती. पुढें जेव्हां कुमार सिद्धराम लांब गेल्यामुळे दिसे-- नासा झाला तेव्हां ती बिचारी विरहानीनें दग्ध होऊन भूमीवर पडली.