पान:अकबर १९०८.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

३५.

 चाललें असतां मधून मधून त्यांची अनेप्रकारची भाषणे होत होतीं परंतु, त्या भाषणांत प्रेमाचा लवलेश नव्हता. तें केवळ औपचारिक होतें. तेवेळीं कुल्लुकानें मंदस्मितपूर्वक कुमाराकडे पाहिलें. कुमारही त्याचे मनांतील आशय समजला. त्याचे मनांतील भाव हाच कीं, गुरुपद योगिराज यांचे आश्रमांत केवळ कंदमूलादिकांचें भोजन होतें परंतु, तें अत्यंत प्रेमादरानें अर्पण केलें असल्यामुळे प्रस्तुतच्या स्वाद्वनापेक्षां अधिक तर रुचकर होतें .. भोजनोत्तर थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलन ते लवकरच निद्रा-- बश झाले. कारण. त्यांना दुसरे दिवशीं अरुणोदयीं उठून आग्राकडे जावयास निघावयाचे हाते..
 परंतु, कुमार सिद्धरामास चांगलीशीं झोंप लागेना, ह्मणून तो आपली तरवार जवळ घेऊन बारद्वारीच्या खिडकींत येऊन उभा राहिला. तेथून त्या अपूर्व: दुर्गाची आणि उद्यानाची. शोभा दृष्टीस पडत होती. तसेंच दुसऱ्या बाजूस अनेक मंदिरांचे कळस आणि ध्वजा अस्पष्टशा दृष्टीस पडत होत्या. त्यावेळीं कुमाराच्या चित्तास इरावतीचें ध्यान तर लागलेलेच होतें. परंतु, त्याही- पेक्षां त्या विलक्षण योग्याच्या भाषणानें त्याच्या चित्तास फारच चटका लाविला होता. सल्हाणासमक्ष त्यानें त्यांच्याशीं जें भाषण केलें होतें,, व त्यानें मार्गांत गुरुपद योगिराजांच्या सिंहाचा पाठलाग केल्याची जी त्यास खूण दिली होती, त्याचें तर त्याला फारच आश्चर्य वाटत होतें.. तेवेळीं तो आपल्या मनांत म्हणाला, “ योगिराज गोरखाला आमचा मार्गांतील वृत्तांत कसा अवगत झाला? याचा परिणाम काय होणार. आहे न कळे. मी सल्हाणाच्या ह्मणण्यावर विश्वास ठेवून त्याच्या बुद्धि-- वादाप्रमाणे वर्तन करूं काय ? तसेंच प्रातःकाळी सल्हाणाशीं जें माझें भाषण झालें आहे, तें गुरुजीपासून गुप्त ठेवं अथवा त्यासर्व गोष्टी स्पष्ट- पणे त्यांना कळवून त्यांची अनुमती घेऊं ?
 वरील प्रकारच्या विचारांत सिद्धराम अगदीं गढून गेला असतां एका-- एकीं तेथून समोर दिसत असलेल्या वाड्याच्या सज्जावर चंद्रकिरणांच्या मंद प्रकाशांत दोन व्यक्ती येऊन उभ्या राहिल्या आणि मोठ्या जोरानें हातवारे करून एकमेकांशी भाषण करूं लागल्या. सिद्धरामानें त्यांच्याकडे न्याहाळून पाहिलें, तों त्यांपैकीं एक योगिराज गोरख असून दुसरा सहाण