पान:अकबर १९०८.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
खंड २रें..

 आंतून हृदय कांपत आहे. आपल्या वचनावर माझा दृढ विश्वास आहे खरा, तरी पण आपण ज्या नगरास जात आहांत तेथील अनुपम शोभा पाहण्यांत आपलें चित्त गुंग होऊन गेल्यावर मग या दासीचें आपणांस स्मरण होणे कठीण आहे..
 सिद्धराम — प्रिये अशी शंका मनांत आणूं नकोस. हैं हृदय तुला कधीही विसरणार नाहीं. इतक्यांत एकीकडून हातांतील काकणांचा ध्वनि त्यांचे कानीं आला. तेव्हां इरावती ह्मणाली, नाथ, मला वाटतें माझी वांबूलवाहिनी निपुणिका इकडे येत आहे. बहुधा आई माझें स्मरण करीत असेल. यावेळीं आपणांला सोडून जाणें माझ्या कसें अगदी जिवावर आलें आहे. इतक्यांत निपुणिका तेथे येऊन ह्मणाली "सखी तुमच्या उभयतांच्या प्रेमालाप्रांत विच्छेद करणें बरोबर नव्हें परंतु, माताजींची आज्ञा ह्मणून सांगणे भाग आहे. त्या आपणांला बोलावीत आहेत आणि ह्मणत आहेत .कीं, आज इरावतीला उद्यानांतून येण्यास इतका विलंब कां लागला.
 मग इरावती अत्यंत विनयपूर्वक सिद्धरामाची आज्ञा घेऊन निपुणिका • आणि कमला यांसह तेथून चालती झाली. इकडे सिद्धरामही आपल्या गुरूकडे जावयास निघाला. त्यावेळीं याचा मंदमंद पदसंचार त्याला पुढें घेऊन चालला होता परंतु, त्याचें हृदय मागें इरावतीकडे आकर्षित झाले होतें. गुरुसमीप गेल्यावर सिद्धरामानें त्यांस प्रणाम करून जवळच एका आसनावर बसला. त्यास कुल्लुकानें विचारिलें, “ एवढा वेळपर्यंत तूं कोणीकडे होतास ? ” सिद्धराम ह्मणाला, मी येथील उद्यान आणि सरोवर यांची शोभा अवलोकन करीत होतों, " पुढें सिद्धराम उद्यानाच्या शोभेचें कांहीं वर्णन करीत होता इतक्यांत सल्हा- णाकडून आलेला दूत पुढें येऊन अत्यंत नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला, 'भोजन तयार असून स्वामी आपल्याच येण्याची वाट पहात आहेत. ' कुल्लुक म्हणाला ' ठीक आहे, चला आह्मी आलोंच. ' आलेला दूत निघून गेल्यानंतर कुल्लुक आणि कुमार तेथून उठून सल्हाण ज्याठिकाणी बसला होता त्याठिकाणी आले. तेथें भोजनाकरितां अनेक- प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ अगदीं तयार करून ठेविले होते. आपले अतिथि येतांच सल्हाणानें अत्यंत सत्कारपूर्वक त्यांस भोजनास बोलाविलें. भोजन