पान:अकबर १९०८.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
खंड २ रें.

आहे असें त्याचे दृष्टीस पडलें. अशा रात्रीच्यावेळीं ते दोघे त्यास्थळें येऊन काय गुप्त मसलत करीत होते तें कळण्यास कांहींच मार्ग नव्हता. यावेळीं त्यांनीं दिवसाचा पोषाख टाकून वेगळा पोषाख धारण केला होता. दोघेही इकडून तिकडे फिरतां फिरतां मोठ मोठ्यानें हात हलवून बोलत होते. इतक्यांत आणखी ही पुष्कळसे लोक तेथें आलेले सिद्धरामाच्या दृष्टीस पडले. ते शरीरानें सडपातळ आणि वर्णानें काळे असून त्यांच्या कमरेस एक एक धोतर मात्र गुंडाळलेलें होतें. सर्वांच्या गळ्यांत असलेलीं शुभ्र स्वच्छ यज्ञोपवीतें दुरूनही स्पष्ट दिसत होतीं. ते सर्व लोक समीप येतांच सल्हाण एका गुप्त जिन्यानें खाली उतरला आणि गोरखानें मोठया गौरवाने हातानें खूण करून आपला मार्ग स्वीकारल्यावर तो सर्व विल- क्षण जनसमूह हळू हळू दाबून पावले टाकीत त्याचे मार्गे चालला. कुमार मुकाट्यानें असल्या जागींच उभा राहून त्यांची मोजदाद करीत होता. क्रमशः ते सर्व लोक तेथून निघून जाऊन दिसेनासें झालें.
 त्या लोकांचा तो विचित्र वेष, गोरखाचें संदिग्ध व संशययुक्त भाषण, सल्हाणानें दाखविलेलें कालिकेचें मंदिर इत्यादि गोष्टी मनांत येऊन कुमार सिद्धराम कांहीं काळपर्यंत भयचकीत झाला व मनांत म्हणाला, ज्या लोकांचा वृत्तांत मी आजपर्यंत ऐकत आलों ते अजूनपर्यंतही विद्यमान आहेत काय ? " सिद्धरामानें ठगांचा वृत्तांत आपल्या देशांत असतां ऐकिला होता व ते लोक दुर्गादेवीचे भक्त असून तिला नरबली अर्पण कर- णारे आहेत असेंही त्याला समजलें होतें. घर वर्णन केलेला जनसमूह दृष्टीस पडतांच त्याला त्या ठगवृत्तांताचें स्मरण झालें. मनांत म्हणाला, 66 काय ? माझे भावी श्वशूर बादशहाचे सेवक असूनही या असल्या लोकांशी संबंध ठेवतात काय ? छे, छे, असें असणें कदापि संभवणार नाहीं. हा केवळ माझ्या अज्ञानाचा दोष आहे. " अशाप्रका- रचा विचार करीत करीत तो तेथून परतला आणि अंगावरील वस्त्रे काढून ठेऊन पलंगावर पडला तथापि त्याला निद्रा कशी ती सुळींच आली नाहीं. त्याचे चित्तांत केव्हां इरावतीचें मुखकमल, केव्हां सल्हाण आणि 'साथीदारांसह गोरख यांच्या मूर्ति वारंवार उभ्या रहात. तेवेळीं त्यानें आपल्या मनाशीं निश्चय केला कीं, जें कांहीं मी आज पाहिलें किंवा