पान:अकबर १९०८.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

३३

 इरावती खाली मान घालून संकोचयुक्त वाणीनें झणाली, कमला आतां घेऊन येईलच. मग आपण खुशाल पहा काय आहे तें. "
 आमच्या वाचकांना त्यावेळचा मनोहर देखावा पाहण्याची अत्यंत अभिलाषा असेल. परंतु, ज्यांना भाग्यवशात् असल्या प्रेमबंधनाचा अनुभव घडला असेल त्यांनाच केवळ वरील देखाव्याचें शब्दचित्र मीहित करील. इरावतीनें किंचित् लज्जित होऊन, दृष्टी खाली करून विनीत भावानें उभें राहणें, आणि सिद्धरामानें प्रेमभावानें तिचा कोमल हस्त धरून तिच्या मधुर सौंदर्याचें निरीक्षण करणें कोणत्या रसिकवराचें चित्त मोहित करणार नाहीं ?

 इतक्यांत कमला एक स्वच्छ वस्त्राखालीं झांकलेली एक मूर्ति घेऊन आली आणि सिद्धरामापुढें ठेऊन झणाली, “ पहा ओळखा बरें, सखी इरावतीनें ही कोणाची मूर्ति बनविली आहे ती ? ” सिद्धरामानें आपली हुबेहूब मूर्ति अवलोकन करून आश्चर्यचकित होऊन झटलें, “ प्रिये, धन्य आहेस, तुझें कौशल्य अत्यंत प्रशंसनीय आहे. जशी तुझ्या ठिकाणी लज्जा आणि नम्रता वास्तव्य करीत आहे त्याप्रमागेंच तुझ्याठिकाणीं गुणही अपूर्व आहेत. " इरावती कांहीं वेळ स्तब्ध राहून म्हणाली, "नाथ, मी एक शकून पहातें. पाहूं बरें काय होतें तें ?” इतकें ह्मणून तिनें एक कमलपुष्प घेऊन तें एका कमलपत्रावर ठेऊन सरोवरांत सोडून दिलें. पत्रावर पुष्प तरूं लागलें. तेव्हां तिनें किनाऱ्यावरून हाताने पाण्यास आंदोलन दिलें. त्या योगानें जलवेगाबरोबर पुष्पासह तें पत्र डोलूं लागलें. कांहीं वेळपर्यंत तें पुष्प त्या पत्रांवर तग धरून होतें. तें पाहून इरावती झणाली “ नाथ, अद्यापपर्यंत तरी आपलें प्रेम निश्चल आहे हे खास. " इतक्यांत तें पुष्प उलटून पाण्यांत पडलें आणि पत्र तसेंच पोहत राहिलें. तें पाहून इरावतीचे नेत्र अश्रुजलानें भरून आले.
 तेव्हां सिद्धराम ह्मणाला "प्रिये, हें काय तुझें पोरपण ? असल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन एकाद्या अजाण माणसाप्रमाणें माझें तुजवर अचल प्रेम नाहीं असें समजतेंस ? "
 इरावती - नाथ यद्यपि आपलें ह्मणणें यथार्थ आहे, तरी न जाणों माझें चित्त इतकें अधीर कां होत आहे ! खरोखरच माझा अगदीं धीर सुटुन