पान:अकबर १९०८.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
खंड २ रें.

 परंतु, त्या चंद्राचे आड मेघ येतांच तिचें वदन माझ्या सखीनें, आपण लवकरच येथून जाणार, तिचें मन अधिर झालें आहे.
 'इरावती - नाथ, आपणांस जावयाचे आहे असें ऐकितें. दासीचें कराचें स्मरण होतें ?
म्लान होऊं लागतें. असें ऐकिलें असल्यामुळ उद्यां आग्रा येथील राजकीय दरबारांत तेथें गेल्यावर आपल्याला या गरीब  सिद्धः- प्रिये, तूं आपल्याला व्यर्थ कां बरें दुःख करून घेत आहेस ? मी कधीं तरी तुला विसरेन काय ? तुला अगोदर असा संशय तरी कसा आला ? दोन तीन महिने फार कां आहेत ? तुला तें कवी- वचन स्मरत नाहीं काय ? कीं, 'याताः किन्नुमिलन्ति सुन्दरी, याक- रितां प्रिये, तूं कांहीं चिंता करूं नकोस, मी लवकरच येऊन तुला भेटेन,
 इरावती-प्राणनाथ, आपले म्हणणें यथार्थ आहे. परंतु, अशा कवि- वचनांनीं जर मन संतुष्ट राहतें तर काय पाहिजे होतें ? मला असें वाटतें कीं, या कवींना आम्हां अबलांच्या विरहपीडेचें मुळीं देखील ज्ञान नसतें.
 सिद्ध - प्रिये, खरे म्हणतेंस. एके ठिकाणीं म्हटलें आहे ' ॥ बंध्येला न कधींही सुनीतिच्या प्रसववेदना कळती ॥ तें असो. तूं जें म्हणतेस कीं मी तुला विसरेन तें कशावरून ? तुझी मूर्ति तर नेहमीं माझ्या हृद- यांत वास्तव्य करितेच आहे आणि शिवाय नेत्रांच्या संतोषार्थ ही तुझी प्रतिमा मी नेहमी आपल्याजवळ ठेवीत असतो.
 असें म्हणून सिद्धनें आपल्या गळ्यांतील रत्नमाला काढून तिच्या मध्यभागी असलेल्या लहानशा पेटींतून इरावतीची हस्तिदंतावरील काढि - लेली रंगित तसबीर तिला दाखविली. ती पाहून इरावतीला अत्यंत हर्ष झाला. तेव्हां कमला ह्मणाली, “सखी, यावेळींच तूं मोठ्या परिश्रमानें बनविलेली आपल्या प्रियतमाची मूर्ति कां बाहेर काढीत नाहींस ? "
 इरावती कांहींशी लज्जित होऊन तशीच मुकाट्यानें उभी राहिली. तेव्हां कमला लणाली, “ बरें, मीच जाऊन घेऊन येतें. " असें ह्मणून कमला निघून गेली. सिद्धरामानें मोठ्या प्रेमानें इरावतीचा हात धरून झटलें, “प्रिये, कमला तुजबरोबर हळूच भाषण करून काय आणावयास गेली आहे बरें ? सांगत कां नाहींस ? "