पान:अकबर १९०८.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

३१

 कन करीत होती. सिद्धरामानें आपली पावलें तिकडेच वळविलीं. त्याच्या पावलांची चाहुल होतांच इरावतीनें मार्गे वळून पाहिलें आणि सिद्धराम दृष्टीस पडतांच ती संकोचयुक्त अंतःकरणानें उठून उभी राहिली. तिनें आपल्या डोक्यावरील पदर पुढें ओढिला आणि खाली मान घालून पायाच्या अंगठ्यानें जमीन उकरीत उभी असतां हस्तांतील अर्धवट गुंफ- लेल्या माळेकडे टक लावून पाहूं लागली.
 सिद्धरामानें जवळ जाऊन मधुर शब्दांनीं तीस विचारलें “ सुंदरी, तूं येथें एकटी बसून काय करीत आहेस ? "
इरावती-नाथ, मी कांहीं एकटी नाहीं, ती पहा सखी कमला पुष्प- वाटिकेत फुछें आणावयास गेली आहे. मी येथें बसून माळ गुंफीत असतां आपल्या येण्याची-
 सिद्ध - प्रिये, ती अर्धीच माळ मला जास्त शोभा देईल. ती तशीच मला दे. कारण कीं, तूं आमची भावी अर्धांगी आहेस. पुरें कर देती तशीच अर्धी.
 सिद्धरामाचें भाषण ऐकून इरावतीनें किंचित् लाजून हात लांब करून जी अर्धीच गुंफिलेली माळ सिद्धरामाचे हातांत दिली.
 सिद्धराम -- पहावें ईश्वर कधीं या जयमाळेची सार्थकता करितो तें. परंतु, प्रिये, मघाशी मी तुजबरोबर यथेच्छ संभाषण करूं शकलों नाहीं याचें मला फार वाईट वाटलें. तुझ्या परमपूज्य पित्याकडून बोलावणें आल्यामुळे मला तसेंच उठून जावें लागलें.
 इरावती-नाथ, आपणांस एकमेकांशी बोलण्यास मधून मधून बराच अवसर सांपडतों हें काय थोडें आहे ? सिद्धराम -- ही त्यांची आपणांवर मोठीच कृपा आहे ह्मणाव - याची. परंतु, प्रिये, आज तूं किंचित् खिन्न दिसतेस याचें कारण काय ? इतक्यांत कमला फुलें घेऊन तेथें आली आणि इरावतीचें पाठीमागें उभी राहिली.
 तिला उद्देशून सिद्धराम झणाला, 'सखी सांग, तुझ्या सखीचें मुख आज किंचित उदासीन कां झालें आहे ?,
कमला -- चंद्रोदय झाल्यावर कुमुदिनी सदां प्रफुल्लितच रहावयाची.