पान:अकबर १९०८.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
खंड २ रें.

 गोरख - ज्यादिवशी सायंकाळीं तूं योगिराज गुरुपद यांच्या सिंहाचा पाठलाग केला होतास त्यावेळीं तुझी माझी यासंबंधार्ने मग आणखी एकादे वेळीं बोलूं कांहीं सल्लामसलत करावयाची आहे.
 सिद्ध— तर मग मी प्रणाम करितों.
 गोरख - दुर्गा त्वां पातु.
 सिद्ध - ( सल्हाणास ) आर्य, मी आपणांसही प्रणाम करतों..
 सल्हाण - चिरंजीव..
 वर लिहिल्याप्रमाणें प्रणाम करून सिद्धराम तेथून चालता झाला. परंतु, गोरख याच्या शेवटच्या भाषणानें त्याचें चित्त फारच आश्चर्यमय होऊन गेलें होतें. तेव्हां तो आपल्या मनांत म्हणाला गुरुपदाच्या आश्र- मासमीप घडलेला वृत्तांत याना कसा कळला ! त्यावेळीं तर गुरुकुल्लुक शिवाय मजबरोबर दुसरें कोणीही नव्हतें. "
 इतक्यांत समोरच्या वृक्षांमधून आपला एक सेवक येत आहेसें पाहून, कदाचित् याच्या द्वारें गोरखानें तो वृत्तांत समजून घेतला असेल असें सिद्धरामास वाटलें. तेव्हां त्यानें त्या सेवकास अंगुलि निर्देशानें आपले समीप बोलावून विचारिलें - “ बत्स, तुला किंवा गुरुजींच्या सेवकाला येथें आल्यावर कोणी योगिराज भेटून त्याजबरोबर तुमचें कांहीं भाषण झालें होतें काय ? "
 सेवक - स्वामिन्, नाहीं. मला तर या ठिकाणीं कोणी योगिराज भेटला नाहीं.

 सिद्धराम पुन्हां आश्चर्यानें म्हणाला, काय, तुझी येथें कोणा योगिराजा बरोबर भेट झाली नव्हती ? बरें तर तूं जा. "
 इतकें भाषण झाल्यावर सिद्धरामहीं तेथून निघाला. त्याचें अंत:- करण अर्धभयभीत झालें होतें. “ गुरुजीस विचारून या गोष्टीचा खुलासा करून घेतला पाहिजे. " असें मनांत म्हणत तो पावले टाकीत होता. कांहीं दूर गेल्यावर तो एका निचिड कुंजाकडे फिरला आणि पहातों तों प्रिया इरावती तेथील वृक्षांच्या सघन छायेत कमलपुष्पांनीं सुशोभित झालेल्या एका लहानशा सरोवराजवळ एकटीच बसून सृष्टीशोभा अवलो-