पान:अकबर १९०८.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

२९

 दुर्गेचें मंदीर आहे तेथील हे पुजारी आहेत. त्यांची अत्यंत सत्कारपूर्वक भेट घे. हे अत्यंत योग्य पुरुष असून त्यांचें ज्ञान केवळ कल्पनातीत आहे.'
 वरील प्रकारचें संभाषण झाल्यावर सिद्धराम व सल्हाण या दोचांनी गोरख योगिराजास मोठ्या नम्रभावानें लवून प्रणाम केला. तेव्हां त्यानें आकाशाकडे अंजली करून आशीर्वाद दिला कीं, ' श्रीजगत् कल्याणका- रिणी दुर्गा युवाम् पात. '
 सल्हाण - जो काश्मिराहून येणार ह्मणून मी झटलें होतें तोंच हा प्रधानपुत्र सिद्धराम होय.
 गोरख ह्मणाला ‘तर्हि स्वागतमस्य, दुर्गा करो आणि हा अनैक्यापासून दूर राहून एकतेच्या दृढ पायावर आपलें अधिष्टान ठेवो. कारण, त्यापासून अनंत सुखें प्राप्त होतात व सायुज्यतानामक मुक्तीचा तोच मार्ग आहे. सायुजता ह्मणजे काय हें तुला थोडें थोडें कळूं लागलेंच आहे. पुढे किंचित् कालपर्यंत स्थब्ध राहून तो म्हणाला 'ज्याप्रमाणें तुला मुक्तिमार्गाचा बोध होत चालला " आहे, त्याप्रमाणेंच यालाही एकदां संसारपरिचयाच्या वरचे पायरी वर नेल्यावर त्या विषयाचें यथार्थ ज्ञान होईल. किंचित् कालावधीची अवश्यकता आहे- मी याच्या अंत:करणाशीं चांगलाच परिचित झालों आहे आणि माझी खात्री आहे कीं, हा आमच्याच वर्गातला होईल. (सिद्धरामाकडे मान करून ) तुझी आणि माझी आत नुकतीच भेट झाली होती. "
 सिद्ध — पूज्वर, क्षमा करा, मला तर कांहीं आपण भेटल्याचें स्मरत नाहीं.
 गोरख — बरोबर आहे. तुला कसें स्मरण असावें. कारण की, तेवेळी मी मनुष्यष्टीला अगोचर होतों.
प्रायः योगी लोक योगविद्येच्या बळानें पाहिजे तेव्हां अदृश्य होतात व त्यावेळीं ते मात्र दुसऱ्या लोकांस पाहू शकतात आणि ते स्वतः कांहीं दुसऱ्यांचे दृष्टीस पडत नाहींत. अशा प्रकारच्या गोष्टी सिद्धरामानें अनेक वेळ ऐकलेल्या होत्या. त्यामुळे योगिराज गोरखायें भाषण तो मोठ्या गंभीर भावानें आणि आश्चर्यमय मुद्रेनें ऐक लागला.