पान:अकबर १९०८.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
खंड २ रें.

 तितकें धैर्य असेल तर जा आणि अकबरासमोर जाऊन उघडपणें त्याच्या नीतिमत्तेविषयीं आपली नाखुषी प्रदर्शित कर. ह्मणजे पहा काय होतें तें ? तुझ्या सुदैवानें कदाचित् प्राणदंड जरी न झाला तरी कारागृहवास अथवा दक्षिण किंवा बंगाल या देशाची हवा खाणें नशिबीं लिहिलेंच आहे ह्मणून समज. अर्थात् बादशहाशी अशाप्रकारें उघड उघड विरोध दाख- विणें आपल्यास कधीं लाभप्रद होणार नाहीं. त्यापेक्षां धैर्यपूर्वक योग्य समयाची मार्गप्रतीक्षा करणेंच शहाणपणाचें होईल. या युक्तीनें बादश- ह्राचीही कांहींएक हानि न होतां आपण आपल्या मातृभूमीचेंही संरक्षण करूं शकुं.
 सल्हाणाचें हें भाषण सिद्धरामास जरी कोणत्याही प्रकारें न्यायसंमत वाटलें नाहीं तरी सल्हाणाच्या युक्तिवादावर त्याला चांगलासा कोटिक्रम करितां आला नाहीं; ह्मणून तो सल्हाणाचें पुढील भाषण ऐकण्याचे इच्छेनें त्याचे मुखाकडे पहात स्तब्ध राहिला. इतक्यांत एकीकडून एक विलक्षण आकृतीचा पुरुष त्याठिकाणी आला आणि जेथें सल्हाण व सिद्धराम बोलत बसले होते त्यांच्या समीप येऊन उभा राहिला. त्याला पहातांच सल्हाण आदरपूर्वक उठून उभा राहिला आणि त्याचें पाहून सिद्धरामा- नेही त्यास उत्थापन दिलें. हा नवीन आलेला पुरुष उंच काठीचा आणि राव्हळ्या रंगाचा होता. त्यांचे मस्तकावर मध्यभागी काळीभोर लांब शेंडी असून बाकीच्या भागाचें मुंडण केलेलें होतें. त्याच्या डाव्या खांद्यावरून कंबरेच्या उजव्या बाजूपर्यंत वेढून ग्रंथिबद्ध केलेलें असें एक शुभ्र स्वच्छ वस्त्र होतें. डावा हात आणि वक्षस्थल हीं उघडींच होतीं. गळ्यांत एक अत्यंत शुभ्र असें यज्ञोपवीत होतें. त्याचे गाल व डोळे खोल गेले असल्यामुळें त्याचें तपाचरण फार तीव्र असावे असें वाटत होतें. सिद्ध- रामाला जरी कित्येक भयंकर पशूंबरोबर सामना करण्याचा प्रसंग पडला होता आणि जरी त्याचे अंगीं उन्मत्त हत्तीच्या गंडस्थळाचें विदारण कर- याचें अथवा प्रत्यक्ष एखाया मृगराजासही त्याची आयाळ धरून वळवि- याचें सामर्थ्य आणि साहस होतें तरी देखील वर वर्णन केलेल्या व्यक्ती- कडे पाहतांच एक वेळ त्याचें हृदय भीतीनें विकंपित झालें.
 ते वेळीं सल्हाण ह्मणाला, ' हे गोरख योगिराज आहेत. समोर जे