पान:अकबर १९०८.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

२३

 क्यांत एकीकडून कमलेनें त्याठिकाणीं प्रवेश केला. तिला पाहतांच सिद्ध- राम उठून उभा राहिला, आणि म्हणाला "ये सखी ये, तुझी प्रिय सखी प्रसन्न आहेना ? तिला आमचें कधीं स्मरण होतें काय ?
 कमलेनें उत्तर केलें, “ हैं काय विचारतां ? कमलिनीला सहस्रकरावां- चून दुसरी गति आहे काय ?,
 सिद्धराम - सखी कमले, तूं स्वभावतःच मधुरभाषणी आणि प्रज्ञावती अर्थात् मोठी गोडबोली आणि चतुर आहेस ! बरें तें असो, तुझी सखी कोठे आहे ?
 कमला-ती यावेळीं यमुना-महालांत बसून आपलीच वाट पहात आहे. मी माताजींची आज्ञा घेऊन आलेच आहे. आपण मजबरोबर यमुना-महालांत चलावें.
 सिद्धराम —बरें तर चल
.  सिद्धरामास बरोबर घेऊन कमला यमुलामहालाच्या द्वारावर येऊन पोहोंचली. तिनें आंत पाऊल टाकलें मात्र कीं, इरावतीचें हृदय हर्षातिश- यानें उचंबळू लागलें. परंतु, कुमार सिद्धरामाकडे दृष्टी जातांच तिनें आपले डोक्यावरील बुरखा पुढे ओढिला व लज्जानम्र होत्साती भूमीगत दृष्टी करून ती उभी राहिली.
 कमला -- सखी आतां कां बरें लाजतेस ? आतां कां नाहीं बोलत ? तूं कुमाराचें स्वागत कर. मी जाऊन तांबूलवाहिनीला बोलावून आणितें. तांबूलवाहिनीला बोलावण्याचें मिष करून कमला बाहेर निघून गेल्या- वर सिद्धरामानें आपल्या हातानें इरावतीचा दक्षिणहस्त धरून लटलें, " सुंदरी, फार दिवसपर्यंत तुजला वियोगदुःख दिल्याबद्दल मजवर रागा- वलीस वाटतें ? "

 सिद्धरामाचें भाषण ऐकतांच इरावतीच्या नेत्रांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी ती झणाली, नाथ, मी आपणांवर रागावलें तर नाहींच परंतु, इतके दिवसांत माझें आपणांस स्मरण देखील झालें नाहीं, याबद्दल दुःख मात्र होत आहे. किती दिवसांपासून तरी मी आपली वाट पहात होतें. माझी तर अशी अटकळ झाली होतीं कीं, कदाचित् आपण या दासीला विसरूनही गेला असाल. "