पान:अकबर १९०८.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२

खंड २ रें.

 वतीच्या मनांत एका क्षणांत अनेक भावना उत्पन्न झाल्या. ती ह्मणाली, इतक्या प्रसन्न मुद्रेनें मजकडे धांवत आलीस ती अशी काय मोठी आनंदाची गोष्ट सांगणार आहेस ? ” आनंदानें कमलेचा गळा भरून आला असल्यामुळे तिच्या मुखांतून पुरता शब्दहि बाहेर पडत नव्हता. तथापि, तशा स्थितींतच ती झणाली, "सखी, ज्या तुझ्या प्राणनाथांच्या मुखचंद्राच्या उद्याची तूं चकोरी सारखी वाट पहात होतीस ते स्वतः किल्ल्याच्या द्वारांत उभे राहून तुझ्या पित्याशीं संभाषण करीत असलेले माझ्या दृष्टीस पडले. गुरु कुल्लुकही त्यांचे बरोबर आहेत. "
 ही अत्यानंदकारक वार्ता ऐकून इरावतीचें हृदयसरोवर आनंदजलानें डुचमळूं लागलें. इतक्यांत तिला वाटलें कमला आपली थट्टा तर करीत नसेलना ? ती ह्मणाली "सखी, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, खरेंच सांग काय तें ! "
 कमलेने मोठ्या प्रेमानें इरावतीचा हात धरून झटलें, “सखी, सांप्रत असा कोणता विनोदाचा अवसर आहे ह्मणून मी खोटें बोलेन ? मी तुझ्या गळ्याची शपथ वाहून सांगतें कीं, आतांच ते येथे येऊन पोचलें. तुझ्या हृदयांतील भाव मी समजलें. करितां मी आतां तिकडे जाऊन माताजींची आज्ञा घेऊन कोणत्या तरी युक्तीनें त्यांना इकडे तुझ्या भेटीस घेऊन येतें. इरावती किंचित् लज्जित होऊन झणाली, सखी, मी तुला काय सांगूं तूं स्वत: चतुरच आहेस. "
 याप्रमाणें भाषण झाल्यावर कमला इरावतीचा निरोप घेऊन चालती झाली. आतां वाचकांनीं सिद्धरामाकडील वृत्तांत ऐकावा.

 सिद्धराम आणि कुल्लुक हे दुर्गद्वारावर येऊन पोहोंचतांच तेथील द्वारपालाने लागलीच दुर्गाधिकारी सल्हाण याजकडे जाऊन त्यास सिद्ध- राम आणि कुल्लुक आल्याची वर्दी दिली. तें ऐकतांच सल्हाणानें स्वतः पुढें होऊन त्यांचें स्वागत केलें आणि त्यांस कुशलप्रश्न विचारून यथोचित रीतीनें त्यांचें आदरातिथ्य केलें. पुढें कुमार सिद्धराम सल्हाणानें दाखवि- लेल्या स्थानीं बसला असतां त्याची दृष्टि समोर असलेल्या उद्यानाकडे गेली, व तत्क्षणीं त्याच्या हृदयांत त्याच्या प्रियतम इरावतीनें प्रवेश केला. इरावतीचें स्मरण होऊन कुमाराचें चित्त तिजकडे वेधलें आणि इत-