पान:अकबर १९०८.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

२१

पल्या घरट्यांतून डोकीं बाहेर काढून चीं चीं, करीत होती. गंगाप्रका- हाच्या मध्यभागीं कोठें कोठें सूक्ष्म वालुकाकणांचे उंचवटे बनले होते, आणि कोठें सपाट मैदान झालेलें होतें. किनाऱ्यावर कराड्यांची शोभा फारच विलक्षण दिसत होती. असो. वर वर्णन केलेल्या उपवर कन्येनें एक साधारण वस्त्र परिधान केलें होतें. त्यावरून ही विहरिणी कांहीं कोणी राजकुलांत उत्पन्न झालेली नाहीं असें सहज अनुमान होत होतें. तिनें परिधान केलेलें वस्त्र केवळ एक स्वच्छ आणि शुभ्र अशी साडी असून तिला तांबडे जरतारी कांठ लाविले होते. तिनें आपल्या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांचा आंबाडा बांधून त्यांत एक मालती पुष्पाची कळी खोंविली होती. तिचे चंचल नयनयुगुल मीन युग्मासही लज्जित करीत होते.. खरोखर जिला कामदेवानें एवढ्या शोभेची देणगी दिली होती, तिला अन्य भूषणांची काय अवश्यकता आहे ? आह्मी इरावतीच्या कोणकोणत्या अंगाचें वर्णन करावें ? एकाहून दुसरें न्यून असेल तर सांगावयाचें ? तिचें तर प्रत्येक अंग सौंदर्यपूर्ण होतें... आणि त्यासही शील आणि लज्जा यांची जोड मिळाली असल्यामुळे तर सोनें आणि सुगंध यांचें ऐक्य झाल्यासारखें झालें होतें.
 परंतु पूर्वी जसें त्या सृष्टीशोभारूप सूर्याच्या दर्शनानें इरावतीचें हृदय- कमल विकसित होत होतें, त्याप्रमाणें आज झालें नाहीं. आज तिचें हृदयकमल विरहतापानें कोमेजून जात होतें. ती प्रतिदिवशीं त्या बार- द्वारींत बसून आपल्या भावी प्राणनाथाच्या आगमनाची मार्गप्रतीक्षा करीत असे. परंतु, अशा रीतीनें वाट पाहतां पाहतां कित्येक दिवस लोटले.... तिच्या हृदयांत अनेक विचारतरंग उठत. नाथाला येण्यास कां बरें विलंब लागला ? कांहीं अवश्यक कामामुळे तर त्यांस अडथळा झाला. नसेल ? त्यांजवर कांहीं संकट तर आलें नसेल ना ? माझा त्यांस विसर तर पडला नसेल ना ? प्राणनाथ कधीं माझें स्मरण करीत अस- तील काय ? ” अशा अनेक प्रकारच्या शंका काढून ती विचार करीत बसे.
 ज्या दिवशींचा वृत्तांत आह्मी लिहीत आहों त्या दिवशी इरावती वर लिहिल्याप्रमाणें सचिंत बसली असतां तिची कमला नांवाची सखी मोठ्या प्रसन्नमुद्रेनें धांवत धांवत तिजकडे आली. तिला पाहतांच इरा-