पान:अकबर १९०८.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
खंड १ लें.

 कता वाटल्यास मीं निर्भयपणें त्यांच्याच चरणकमलांचें दर्शन घ्यावें. कुल्लुक — गुरुपदांस परत भेटण्याचें वचन देऊन तूं आलास ही फार चांगली गोष्ट केलीस. तें वचन मात्र तं विसरूं नकोस. आम- च्यापेक्षां श्रीगुरुपद महाराज अधिक बुद्धिमान् असून व्यवहारिक गोष्टींतही अत्यंत अभिज्ञ आहेत.
 कुल्लुका वरील भाषण सिद्धरामाच्या चांगलेंसें कानीं पडलें नाहीं. त्याचें हृदय गुरुपदचरणसरोजांचे ठायीं मिलिंदायमान . झालेलें होतें. तसेंच त्याचें चित्त गुरुपद योगिराजांची भेट आणि त्यांच्या वास्तव्याची गुप्तता यासंबंधानें अत्यंत कुतुहल युक्त होत होतें. आणि प्रवासाच्या प्रारंभींच आपणाला अशा राजऋषींची भेट झाली कीं, ज्यांनी केवळ आपला भ्राता आणि स्वदेश यांच्या प्रेमास्तव समस्त सुख- संपत्ति आणि राजलक्ष्मी तृणवत् समजून ऐश्वर्यमोहाचा त्याग केला . आणि देशहितावर दृष्टि देऊन जे एकांत तपोवनवासांत प्रसन्न अंतःकर- णानें वास करीत आहेत आणि ज्यांनी एका मृगराजाखेरीज दुसऱ्या • कोणावरही मोहममता जडूं दिली नाहीं, याबद्दल त्यास फारच समाधान वाटत होतें. त्यावेळी तो आपल्या मनाशी म्हणाला, ' इकडे मला अशा- -प्रकारचा शुभ शकुन झाला आणि तिकडे मी त्या परमभाग्यशाली महा- त्म्याच्या दरवारी जात आहे कीं, जो केवळ खड्गबळानें नाहींतर बुद्धि- बळाने एका विस्तीर्ण प्रदेशाच्या संत्राटलक्ष्मीला धारण करीत आहे, ज्याचा आयव्यय अपाराम आहे, दूरदूरचे प्रतापशाली राजे ज्याला वशीभूत झालेले आहेत आणि जो अखिल भूमंडलावरील धर्माचा पालनकर्ता म्हणून मानला जात आहे.
 वाचकहो, आपला कुमार सिद्धराम स्वताहाचा सद्वंश आणि सद्गुण यांबद्दल मनांत अहंकार वागवीत होता. परंतु, यावेळीं तो आपल्याशींच म्हणाला की, या दोघां महापुरुषांच्यापुढे मी " कोण्या झाडाचा पाला " - आहे! अकबर आणि योगिराज यांत श्रेष्ट कोण हें ठरविणें अत्यंत कठिण होतें आणि शहान् शहा अकबराचें प्रत्यक्ष दर्शन होऊन त्याच्या वृतीबद्दल थोडा तरी अनुभव आल्यावाचून आपण या दोघांच्या श्रेष्ठ कवितेचा विचार करणें बरोबर नाहीं, असेंच त्याने ठरविलें, असा.