पान:अकबर १९०८.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर.

१९

 कांहीं वेळाने वरील विचार कमी होत जाऊन कुमाराचें चित्त प्रयागा- कडे वळले. त्याठिकाणीं त्याची वचनबद्धा सौंदर्यशीलसंपन्ना इरावती नामक भावी अर्धांगी त्याच्या आगमनाची रात्रंदिवस मार्गप्रतीक्षा करीत. होती. तिचें स्मरण होतांच कुमाराचें मुखकमल पूर्वीपेक्षांही जास्त प्रफु- ल्लित झालें. मग सपाटसा भूप्रदेश लागतांच त्यानें आपल्या घोड्यास टांच दिली आणि बर्ची उचलून कुल्लुकास म्हटलें, चला, घोड्यास जरा. पट्टीवर घ्या, आपण कां उगीच रेंगाळत चाललों आहोंत. "
 कुल्लुकानेंही आपला घोडा दामटून म्हटलें, “चला घोडा पुढें काढा. "" असें म्हणून पुन्हां आपल्या मनाशीं तो विचार करूं लागला कीं, " कुमा-- राचें वय अद्याप बरेंच लहान आहे. ईश्वर करो आणि त्याचे मार्गांत एखादा कंटक उपस्थित न हो. परंतु, जो मनुष्य संसारयात्रेस निघाला, त्याला तंत्स-- बंधीं नदी नाले, खांच खळी हे लागावयाचेच, इतकेंच नव्हे तर प्रसंगोपात एखादी भयंकर गर्तही मार्गांत आड यावयाची. " पुन्हां आदल्या दिव- शींचा वृत्तांत मनांत येऊन किंचित् आनंदित होऊन ते ह्मणाले “ परंतु, माझी ईश्वराजवळ एवढी प्रार्थना आहे कीं, तो याचा मार्ग सरळ आणि निष्कंटक राखो. "