पान:अकबर १९०८.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
खंड १ लें

.

नांत व्यत्यय येऊ दिला नाहीं.तथापि, बाकी राहिलेल्या विरुद्व मंड- ळीचें उत्पात करणें सुरूंच होतें. त्यामुळे त्याला राज्यांत शांतता राख- ण्यासाठी आपल्या असंतुष्ट आणि तापद परंतु, प्रिय अनुजास यमाच्या घराचा अतिथि बनवून त्याच्या सर्व अनुयायी मंडळीसही त्याच्याच प्रारब्धभोगाचे भागीदार बनविल्यावांचून दुसरा मार्गच राहिला नाहीं. परंतु, असें करण्यापासून एक तर राज्यांत अतिशय रुधिरस्राव झाला असतां दुसरें, अनेकप्रकारचे बखेडे उत्पन्न झाले असते आणि सर्वांत मोठी हानिही झाली असती कीं, राजाच्या पश्चात् कोणीही राजकुलो- उत्पन्न मनुष्य राज्याला अधिकारी राहिला नसता. राजाच्या मनांत इकडे अशाप्रकारचे उच्च विचार घोळत होते आणि तिकडे विरोधी लोकांचा असा समज होऊन चुकला होता कीं, राजा बंदिवान् केलेल्या लोकांस प्राणदंड केल्यावांचून रहावयाचा नाहीं. अशा प्रकारची स्थिति असतां एकेदिवशीं प्रातःकाळी महालांत कोलाहल सुरू झाला कीं, महाराज रात्रीचे वेळीं कोठें नाहींसें झाले. त्यांचा पत्ता नाहीं. आणि जरी त्यांच्या गुप्त होण्याच्या कारणाचा निर्णय झाला नव्हता तरी सर्वांनी एकच अनुमान केलें होतें कीं, ते विरुद्वपक्षाच्या मंडळीकडून मारले गेले असावे. तेव्हांपासून पुन्हां त्यांचे काय झालें याविषयीं कांहीं पत्ता लागला नाहीं. शेवटीं बंदींत असलेल्या धाकट्या भावानें आपली सुटका करून घेऊन राज्यकारभार आपलें हातीं घेतला. कारण, त्याच्या शिवाय दुसरा कोणीही धर्मशास्त्रानुसार गादीला वारस नव्हता. अद्यापही तो धाकटा भाऊच गादीवर कायम असून राज्याचा भार वहात आहे. आणि त्याने मोठ्या शहाणपणानें आपल्या वडील बंधूंच्या वेळच्या सर्व मंत्रिजनांस त्यांच्या त्यांच्या हुद्यांवर कायम ठेविलें आहे. कोणासही आधिकारावरून दूर केलें नाहीं. तेणेंकरून जरी त्याच्या अंगची बुद्धिमत्ता राज्यशासनास पुरेशी नाहीं तरी राज्यकारभार उत्तमप्रकारें चालला असून राज्यांत सर्वत्र शांतता वास करीत आहे. "
 इतका वृत्तांत सांगून कुल्लुक मुकाट्यानें आपल्या शिष्याच्या मुखा- कडे पाहूं लागला. परंतु त्यानें त्याच्या मुखावर कोणत्याही प्रकारें आश्चर्य कंवा विशेष कौतुकाचें चिन्ह अवलोकन केलें नाहीं. तेव्हां सिद्ध