पान:अकबर १९०८.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर

.

१५

उत्पन्न झाली असेल यांत संशय नाहीं. परंतु, ती तूं दाबून धरलीस; यास्तव, मी आतां तुझ्या कुतुहलाचें निरसन करितों. आपले नांव आणि पूर्ववृत्तांत तुजपाशीं गुप्त न ठेवितां तुला निवेदन करण्याविषयीं गुरुपदांचीही मला आज्ञा आहेच. हे गुरुपद पूर्वी राजपदाचा उपभोग घेत होते आणि-
 सिद्धरामानें किंचित् व्यग्र होऊन विचारिलें, ' * सोमदेवाची कथा तर नाहीं सांगत ? जशी आपण लहानपणीं मला सांगत असां ?,
 कुल्लुकानें शांतपणानें ह्यटलें, 'पहिल्यानें ऐकून तर घे. आपल्या काश्मीर देशांत पूर्वी एक राजा होऊन गेला. तो नेहमीं आपल्या परम योग्य आणि दूरदर्शी मंत्रिजनांच्या संमतीनें उत्तमप्रकारें नीतिपूर्वक राज्य- शासन करीत असे. त्याला संतति झाली नसून केवळ एक धाकटा भाऊ मात्र होता. तो भाऊही मोठा विद्वान् आणि चतुर होता. राजाची आपल्या भावावर अत्यंत प्रीति होती आणि त्यानें आपल्या मनाशीं संकल्प केला होता कीं, आपला अंतकाळ समीप आल्यावर अथवा कांहीं मर्या- दित काळ लोटल्यावर आपल्या धाकट्या भावास राज्याचा अधिकारी बनवून आपण भगवत्प्राप्तीच्या उद्योगास लागावें. परंतु, त्याच्या धाकट्या बंधूची तृष्णा मर्यादे बाहेर होती. आणि जात्या इतर सर्व गुणांनी युक्त असतां कोणत्याही प्रकारें आपली तृष्णा दाबून वडील बंधूनें योजिलेल्या काळाची प्रतीक्षा तो करूं शकला नाहीं,
 अशा प्रकारची त्याची वृत्ति असल्यामुळे त्यावेळच्या राजद्रोही मंड- ळींच्या नादी लागून प्रथमतः त्यानें गुप्तपणें कपटप्रबंधांची योजना केली आणि नंतर उघडपणें आपल्या पितृतुल्य वडील बंधूंच्या विरुद्ध बंड उभें केलें. परंतु, राजानें आपल्या चातुर्यानें त्याला त्याच्या साथिदारांसह पकडून आणविलें आणि त्याला चांगल्या बंदोबस्तांत ठेवून राज्यशास-
 * सोमदेवभट्ट हा काश्मीरच्या राजाचा मंत्री होता. त्यानें राजम- हर्षीच्या प्रोत्साहनावरून " कथासरित्सागर " नांवाचा एक फार मोठा ग्रंथ लिहिला आहे. सांप्रत निर्णयसागर छापखान्यांत तो उत्तमप्रकारें छापून प्रसिद्ध झाला आहे.