पान:अकबर १९०८.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
खंड १ लें

.

तेव्हां सिद्धराम गुरुपदांच्या भाषणाचा विचार करीत मुकाट्यानें कुल्लुका- बरोबर घोडा चालवीत आपला मार्ग क्रमूं लागला.
 कांहीं वेळानें आपल्या या मौनव्रतानें आणि योगिराजांच्याठायीं ध्यानावलिप्त झाल्यानें गुरुजी कदाचित् अप्रसन्न तर झाले नसतील ? अशी शंका येऊन सिद्धरामानें आपला घोडा मुद्दाम कुल्लुकांच्या जवळ वळवून आणिला आणि नंतर त्यांच्याशीं बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला “आर्य, गुरुपदांसारखा मनुष्य आजपर्यंत कधींच माझ्या. पाहण्यांत आला नाहीं. "
 सिद्धरामाची शंका व्यर्थ होती. गुरुपदांविषयीं सिद्धरामाचे वरील उद्गार श्रवण करून कुल्लुकांस अत्यंत आनंद झाला. व सिद्धरामाचें अंगीं परीक्षायुक्त गुणग्राहकता आलेली पाहून त्यास फारच समाधान वाटलें. मग तो सिद्धरामास म्हणाला 'तुझें ह्मणणें यथार्थ आहे आणि गुरुपदांविषयीं तुझी अशी सद्भावना झालेली पाहून मला मोठा संतोष वाटला. यावरून तुझ्या मनाचा मोठेपणा उत्तमप्रकारें व्यक्त होत आहे."
 कांहीं काळपर्यंत विचारमग्न होऊन सिद्धनें विचारिलें “ परंतु, हें तर सांगा कीं, हे गुरुपद कोण आहेत ? "
 कुल्लुकानें उत्तर दिलें “ तूं प्रत्यक्ष पाहिलेंसच कीं, ते हिमाचलवासी योगिराज आहेत ! झाले आणखी काय ?
 सिद्धराम अधीरतेनें झणाला तें तर मीं उत्तमप्रकारें पाहिलें.. परंतु, येथें येऊन राहण्याच्या आणि सिंह वश करण्यापूर्वी हे कोण होते, ते जाणण्याची माझी इच्छा आहे. "
- कुल्लुक — त्यांनी मनुष्यांनाहीं याचप्रमाणें वश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो त्यांचा प्रयत्न अखेरपर्यंत टिकला नाहीं. तें असो.. परंतु, हा प्रश्न तूं त्यांनाच कां विचारला नाहीस ?
 सिद्धराम - तसें करणें उचित झालें असतें ? आणि आपण तरी ती गोष्ट शिष्टसंमत समजतां काय ?
 कुल्लुक -- कधीं नाहीं ! तूं फार योग्यप्रकारचें वर्तन केलेंस. तुझें कोणतेही आचरण अतिथीपणास विरुद्ध असें झालें नाहीं, ही मोठी उत्तम गोष्ट झाली. त्यावेळीं तुझें मनांत उत्कंठापूर्वक जिज्ञासा