पान:अकबर १९०८.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
खंड १ लें

.

 गुरु कुल्लुक त्याजबरोबर क्षणभर कांहीं एकांतांत भाषण करणार आहे. त्याबद्दल तूं कोणत्याही रीतीनें आपल्या मनांत विषम भाव येऊ देऊं नको. त्याचे बरोबर मला जें बोलावयाचें आहे, तें अत्यंत गुप्त असून तुझा त्याच्याशीं कांहीं संबंधही नाहीं. तुझी इच्छा असल्यास सरोवरावर जाऊन तेथील यावेळची शोभा अवलोकन कर अथवा सध्या उष्णकाल आहेच; मनास वाटल्यास जलक्रीडा कर. तुला उत्तमप्रकारें पोहण्याचा अभ्यास असेलच. खरोखर संध्याकाळी चंद्रप्रकाशांतील जलावगाहन फारच आनंददायक असतें. "
 गुरुपदांच्या मनांतील भाव जाणून कुमार म्हणाला 'जशी श्रीमंताची  आज्ञा- '
 कुल्लुक आणि गुरुपद एकीकडे निघून गेले आणि कुमार मोठ्या कौतुकानें त्यावेळची अलौकिक सृष्टीशोभा अवलोकन करीत इकडे तिकडे फिरू लागला. तिकडे कुल्लुक आणि गुरुपद यांचे एकाग्रतेनें संभाषण झाल्यावर ते उठून पूर्वस्थानीं आले आणि रात्र बरीच झाली असल्यामुळे सर्वांनी निद्रासुखाची इच्छा प्रदर्शित केल्यावरून सेवकांनी तयार केलेल्या शयनावर कुल्लुक आणि कुमार यांनीं शयन केलें. त्यावेळी तेथल्या तृण- ariara त्यांना गाढ झोप लागली. कारण वाटेच्या श्रमाने ते फारच थकून गेले होते. गुरुपदही आपल्या नित्याच्या स्थानी जाऊन निद्रावश झाले.
 प्रातःकाळ होतांच मोठया लगबगीनें उठून त्यांनी संध्यावंदनादी सिद्धता केली. तिकडे सेवक घोडे कसून तयारी करीत असतां इकडे गुरुपदांनी सिद्धरामाचा हात धरून हळू हळू त्यास एकांतस्थांनीं नेलें. आणि पुढीलप्रमाणे अत्यंत कळकळीच्या शब्दांनीं त्यास उपदेश केला.
 वत्स, तुझ्यासारखे तरुण लोक आह्मासारख्या योग्यांच्या अथवा मुनिजनांच्या दर्शनास आले असतां त्यांना थोडा तरी उपदेश केल्या- वाचून विन्मुख जाऊं देऊं नये अशी प्राचीन काळापासूनची रीत अथवा धर्मच आहे म्हटलें तरी चालेल. तसेच, तुलाही मजपासून कांहीं उप- देशाचे शब्द ऐकण्याची इच्छा असेल. परंतु, तुझा गुरु कुल्लुक यानें जो कांहीं तुला उपदेश केला असेल त्याहून अधिक सांगण्यासारखे मजजवळ कांहीं एक नाहीं. कुल्लुकाची बुद्धिमत्ता आणि शिक्षणचातुर्य मला पूर्ण-