पान:अकबर १९०८.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अकबर.

११

 योगिराजांच्या सरळ आणि मधुर भाषणावरून ते प्रापंचिक व्यवहा -- रामध्येही अत्यंत निपुण आहेत अशी मंत्रीपुत्र सिध्दरामाची खात्री झाली. गुरुवदांनी सिद्धरामाच्या पित्याचें कुशल विचारून म्हटलें “ तुम्ही तरी तेथे बऱ्या प्रकारें कालक्रमण करितांना त्यावर कुमारानें अत्यंत नम्रतापूर्वक त्यांच्या प्रश्नाचें सर्मपक उत्तर दिलें. परंतु, त्यांनी जेव्हां इरावतीचें कुशलवृत्त विचारिलें, तेव्हां कुमार लाजेनें खालीं मान घालून मुकाट्यानें बसला. यावर कुल्लुकानें उत्तर दिलें तिकडचीही. सर्व मंडळी खुशाल आहेत. आपले दर्शन घेतल्यानंतर प्रथम आमचा तिकडेच जाण्याचा विचार आहे.
 काश्मीरच्या पूर्व स्थितिबद्दलची योगिराजांस इतकी पूर्ण माहिती असलेली पाहून कुमारास मोठें आश्चर्य वाटलें. शिवाय ज्या गोष्टी राजमहालांतील अंतःपुरचारी लोकांखेरीज इतरांस. अगम्य असाव- याच्या, त्या देखील योगिराजांस पूर्णपणें अवगत आहेत. असें जेव्हां त्यानें पाहिलें, तेव्हां हे योगिराज पूर्वी कोणातरी राजपुत्राचे विश्वासपात्र उपदेशक अथवा मंत्री असावे, असा त्यानें तर्क केला. परंतु, योगिराजांच्या एकंदर संभाषणावरून ते सदां प्रसन्न आणि त्यांच्या प्रस्तु- तच्या स्थितीतच अत्यंत संतुष्ट असल्याचे दिसून येत होतें. तथापि, काश्मीर-- विषयक संभाषण करीत असतां केव्हां केव्हां त्यांच्या मुखावर औदासि- न्याची छाया येऊन दीर्घश्वासाबरोबर अंतःस्थ खेदाचीही थोडी झुळूक बाहेर पडे.
 वर वर्णन केल्याप्रमाणें संभाषण चाललें असतां बराच वेळ अतिक्रांत होऊन संध्यासमय प्राप्त झाला. अंतरिक्षांत पूर्णचंद्राचा उदय झाला असल्यामुळे त्याच्या अमृतस्रावी किरणांनी उपवनांची शोभा द्विगुणितः करून टाकिली.. अविरल वृक्षांच्या पर्णसमुदायांतून मार्ग काढून हिरव्या तृणावर क्रीडा करणारे सुधाकराचें समुदायकिरण फारच रमणीय दिसत होतें. आणि इतर जागीं तें सर्व उपवन रौप्यरसानें सारविल्याप्रमाणें भासत होतें.
 एवढा वेळपर्यंत ते तिथे एके जागी बसून संभाषण करीत होतें. नंतर गुरुपद सिद्धरामास ह्मणाले “ आतां मी माझा मित्र जो तुझा