पान:अकबर १९०८.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०

खंड १ लें

.

 ऐकून सिंहानें आपले पुढील पायांचे गुडघे जमिनीवर टेकले आणि आपलें प्रशस्त मस्तक गुरुपदांच्या हातांवर घांसून आपला लडिवाळपणा प्रकट केला. नंतर पुन्हां गुरुपद ह्मणाले “ आणि जे माझे मित्र आहेत, त्यांचे- वर हा मोठा हेतु ठेवितो. तूं पाहिजे तर खुशाल याचे पाठीवर हात . फिरवून पहा. " सिद्धरामानें पुढें सरून हळूच आपला हात त्याचे खांद्यावर ठेविला. त्यावर सिंहानें एकदां आपल्या स्वामीकडे पाहिलें आणि मग कुमाराच्या पायापाशीं जाऊन त्यानें पूर्ववत् त्याच्याही हाता- वर आपलें मस्तक घांशिलें. तेव्हां कुमारही न भितां त्याला चुचकारून त्याच्याशी खेळू लागला. कांहीं वेळानें सिंहानें सहज • आपलें भयानक मुख वांसून मोठी थोरली जांभई दिली ! तेणें- - करून त्याच्या तीव्र दंष्ट्रा समग्रपणे दृष्टीस पडल्या. परंतु, कुमारास त्याचा परिचय झाला असल्यामुळे विशेषसें भय वाटलें नाहीं. नाहींतर त्या त्याच्या कालदाढा पाहून मनुष्य गर्भगळीतच व्हावयाचा !

 यानंतर सिंह कुभाराजवळून उठून गुरुपदाकडे जाऊन बसला. तेव्हां गुरुपद बोलले " ठीक आहे, तुझ्यापेक्षांही जास्त वयाचे कित्येक पुरुष या सिंहास पाहून गडबडलेले मी पाहिलें आहेत. परंतु, तूं चांगलाच स्थिर चित्त राहिलास. असो. आतां दुसऱ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण फार लांबचा प्रवास करून आलां आहांत आणि विशेषत: आपण अशा प्रदेशांतून आलां आहांत कीं, जेथें कांहींच मिळण्याचा संभव नाहीं. कारितां कांहीं थोडीशी कंदमूलफळें भक्षण करून जलपान करा. ह्मणजे वाटेचा शीणभार नाहींसा होईल. चला मजबरोबर आंत चला. " असें ह्मणून योगिराजांनी पुढे होऊन कुटीत प्रवेश केला आणि त्यांचे मागून . ते गुरुशिष्यही आंत गेले.
 कुटीत फक्त अवश्यक वस्तूंचाच संग्रह केलेला दिसला. तथापि प्रत्येक वस्तू जागच्याजागीं नीट रीतीनें आणि स्वच्छतेनें ठेविलेली होती.
 कुटीत गेल्यावर योगिराजांसह ते अतिथी एक प्रशस्त अशा तृणा- सनावर बसले असतां मागें सांगितलेल्या सेवकानें एका परडीत नानाप्रका- रची स्वादिष्ट पक्व फळे भरून आणिली. योगिराजांच्या इच्छेप्रमाणें अति- श्रीजनांनी त्यांचे सेवन केल्यावर एकमेकांच्या कुशल प्रश्नास सुरुवात झाली.