पान:अकबर १९०८.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकबर

.

दाची गोष्ट आहे कीं, मला पुन्हां आपल्या सुखानें आतां आपला देश आणि प्रजा यांचा वृत्तांत ऐकावयास सांपडेल. " कुल्लुक आणि कुमार हे योगिराजांच्या भाषणास उत्तर न देतां त्यांचे मागोमाग कुटीपर्यंत गेले. इतक्यांत जवळच एका बाजूकडुन वन- राजाची भयंकर आणि गंभीर गर्जना त्यांचे कानीं पडली आणि लागलींच एक प्रतापी सिंह आकाशांत आपलें प्रचंड पुच्छ उभारून हळू हळू डुलत डुलत त्यांच्या जवळ येऊन पोहोंचला. त्याला पहातांच सिद्धरामानें आपले पाऊल मागें घेऊन, तत्क्षणी आपला उजवा हात कमरेस लटकत असलेल्या तरवारीकडे नेला.
 सिद्धरामाचें तें कृत्य पाहून गुरुपदांनी हंसून झटलें “ राहूं दे, कां उगीच या कीटावस्तूवर हात टाकण्याचा प्रयत्न करितोस ? त्यानें हराचें काय व्हावयाचे आहे ! " मग त्यांनीं सिंहाकडे पाहून किंचित् धुडकावून त्यास आज्ञा केली “ चल इकडे ये हर ! " गुरुपदांची आज्ञा ऐकतांच तो तेजस्वी सिंह त्यांच्या समीप येऊन पायांपाशीं गुरगुरत बसला.
 तेव्हां कुल्लुक सिद्धरामास ह्मणाला “ मीं जें मघां तुला झटलें कीं, हा तुझ्या बालस्वभावाचा दोष आहे, तें आतां आलें तुझ्या लक्ष्यांत ! " तो सर्व प्रकार सिद्धरामाच्या लक्षांत आल्यामुळे त्यानें गुरुपदांस हात जोडून विनंती केली “स्वामिन् या लेकरावर क्षमा केली पाहिजे. मला काय माहित कीं, तो सिंह श्रीमंतांचा असेल ? मी तर त्याला - "  गुरुपद झणाले मी समजलों, मला वाटतें तूंही हरा- वर शिकार खेळण्याचा प्रयत्न केला होतास. पूर्वीही कित्येकांनी त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु,माझा हा चतुष्पाद त्याला जर कोणी त्रास करीत नाहीं, परंतु कोणी विनाकारण त्याच्या वाटेस जाऊं लागलें,तर मग काय ? तो जातीचा सुगराजच मुळीं ! विचारावयाचा आहे !कुल्लुकास माहीत आहेच त्याचा त्वेष काय की, हा मजजवळ लहान बच्चा होता तेव्हांपासून आहे. आणि आतां तर तो चांगलाच माणसाळला आहे. कां हर खरें आहेना ? " आपल्या स्वामींचें तें भाषण