पान:अकबर काव्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६) साकी. समदृष्टीचे क्रीडां मंदिर पुढे गमे जो लोकां । तत्संगतिनें संकटांतही होई माय वि-शोकी ॥ वैरि-जनांप्रति देणारा जो निजादयोत्तर झोके । पाळण्यांत त्या ठेवुनि देई धात्री हळु हळु झोंके ॥ जयास पुढती स-हृदय कवि-जन गातिल विसरुनि भानें । तया कौतकें ललना गाती गीतें आनंदानें ॥ यदानास बघुनि विमोहक रमतिल सुंदर कांता । मांडीवर तो पडुनि आइच्या रमवी तप्त स्वांता ॥ शत्रु विनाशे तद्रमणींच्या नयनांतुनि असुं ढाळी । मोदबाष्प तो डोळ्यांतुन तैं निज मातेच्या गाळी ॥ राज्य- पदावर पुढे बैसतां पाळिल बहु लोकां जो । त्या परदेशी गुप्त पाळिलें जन नियँतिस नावाजो ॥ व्यजने परिजन जयास वारा घालिल शीतळ मंद। मातेचे त्या अंक लागति दुःखोच्छ्वास अमंदे || स्वरिपु मारणे रणांगणीं जो तत्सुंहृदां रडवील । तो निज-मातेसमीप रडला यद्यपि बाल सुशील ॥ दिंडी. २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ माय बोले आपणाशीच त्याची । बाळ माझी संपदा हेच साची । हरो इजला कोणी न वैरि चोर। दिवस भाग्याचे खचित पुढे थोर ३७ १ विलास - गृह. २ दुःखरहित 3 आपण भरभराटीस आल्यानंतर ४ दाई. ५ रसिक. ६ ( यत् + आनन + इंदु ) ज्याच्या मुखचंद्रास. ७ भाग्यास. ८ पंख्यानें. ९ मोठे. १० त्यांच्या मित्रास.