पान:अकबर काव्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७ ) देव-करुणा- नौकेत तनय नांदे । भीति त्याला काय आनंद कंदे ॥ करों धरितां वाहेल संकटांत । तरी उडविल पर्वतातहि वात ॥ ३८ पुत्र माझा होऊन चक्रवर्ती । प्रजेची निज करिल हो इष्ट-पूर्ति ॥ दुःख आतां तरि सौख्य पुढे पाहे । बळें चेंडू ताडितां उसळताहे ॥ दुःख आधी मग सौख्य भाग्य मोठे । मत्सुताचे आमच्याहून वाटे ।। जीव कंठी काळ की नष्ट आशा । सुखे वाटे पावेल दुःख नाशा ४० बाबराचा पौत्र हा पुढे कष्ट । पारतंत्र्याची स्थिती ऋमिल नष्ट ॥ घडेना हे गोष्ट हो कदाकाळीं । वसे कैसा मृग-राज तो शृगीळी ४१ बाबराने लाविला राज्य वृक्ष । गगनचुंबी विस्तार भव्य दक्ष ॥ कांहिं दिवशीं पावेल बद्ध-मूल। करित असतां अधिकार, आज र्मूल४२ उपजाति. ऐशारिती आक्बर वृद्धि पावे । भीमापरी पुष्ट-तनु स्वभावें ॥ बलाढ्य चाले कलभीसमान । विधूम अग्नी जणु भासमान ॥ ४३ हुमायूनास पुन्हा राज्यप्राप्ति. ४४ हुमायुने मेळविली स्वसेना । जिच्या सर्वे शत्रु लदूं धसेना ॥ जी वाढ घेई नवं- वीर-योगें । महा-नदीशीच सरित्प्रेसंगें ॥ शौर्ये नवा भास्करसा स्व-पुत्र । बैरामसेना-पति आत्म-मित्र ॥ स्वयें तिजा त्यांसह तो निघाला । घालावया वैरि- जनीं स्वैघाला ४५ १ आनंदाचा कंदच अशा देवानं. २ सार्वभौम राजा. 3 इच्छिलेलें पुर- विणें. ४ 'नातु, मुलाचा मुलगा. ५ सिंह. ६ कोल्ह्यांत ७ ज्याच्या मुळ्या खोल जाऊन बळकट झाला आहे असा. ८ जो आज मूल आहे. ९ पुष्ट आहे तनु म्हणजे शरीर ज्याचे असा. १० हत्तीच्या छाव्यासारखा. ११ ज्याला धूर नाहीं असा. १२ नवीन वीर येऊन मिळाल्यानें. १३ नद्या येऊन मिळाल्यानें. १४ बैरामखान. १५ आपल्या.