पान:अकबर काव्य.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) २३ बहु सुखविहुमायूना विपन्निमग्ना तथा सुवार्तते । विपिनांत गजेंद्रा ग्रीष्मी सरिता जशी दवर्तते ॥ २० अतुल निर्जे लावण्यें आधी जी राजयासि आवडली । अमृत-लताशी सफला आतां ती गुणवती प्रिया गमली २१ सुत-जन्म-निमित्तें त्यापाशीं सानंद देणगी द्याया । कस्तूरीविण नव्हतें स्व-जनांस ह्मणे ह्मणून ती घ्या या ॥ २२ कस्तूरिका - सुगंधापरि पसरो कीर्ति हैं धरापाळ । वदला निज तनयाची देवा राखी मदीय हा बाळ ॥ दे पूर्व दिशा जैशी जन्मरविस जन सुखी करायासी । सय्यद-तनुजा तैशी निजपुत्राही सलोक रायासी ॥ किंवा महा-मती ते प्रसवे लोकों जशी प्रबोधास । सय्यद - बालाहि तशी सुतास जो कीर्तिचा वर निवास २५ राज्य-वियोगें विव्हळ पाळी प्रेमें परि स्व-पुत्रातें । राहूनि उमरकोटी माय हमीदा श्रितातपत्रातें ॥ दुःखांत सुखे येती सुखांत दुःखे अनेक संसारी । सुखदुःख-गुणीं विणला पर्ट वाटे पूर्ण हा चमत्कारों ॥ २७ निज-सुत- मुख चंद्राला विलोकितां तात मानसीं भरती । आनंद-सागराचे तरंग मोठे अवर्ण्य ती भरती ॥ १ ( दुव + आर्त ) वणव्याने पिडलेल्यास. २ लोकांसह वर्तमान * आश्रितांस आतपत्र ह्मणजे छत्र अशा ५ सुख-दुःख-रूप संसाररूप वस्त्र. २४ २६ २८ ठिकाण. तंतूंनी. ६