पान:अकबर काव्य.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८४ ) उपेंद्रवज्रा. प्रसंग येतां अति शौर्य दावी । परी न वांछी रण तो वदावी ॥ सु-कीर्ति लोकीं मग कां न त्याची । मती विचारों दृढ लग्न ज्याची ८९ इंद्रवज्रा. जो भोग भोगी परि हाल सोशी । राज्याधिकारी परि जो न दोषी ॥ कामै तया फार तरी रिकामा । ज्ञानी परि गर्व न भू- ललामा ॥ ९० भव्याकृती तो वचनांत साधा। ऐश्वर्य मोठे परि त्या न बाधा ॥ लोभै दिली कोप यमासमान । होती दया शांतिहि ज्यां न मान ॥९१ शार्दूलविक्रीडित कामक्रोध मदांध त्यास करिती उद्दाम आंधी कैरी । कांहीं वेळ कधीं कधीं क्षिति- पती तो यौवनाभ्यंतरी ॥ टाकी पाउल कुत्सिती परि पथीं सन्मार्गवर्ती पुन्हा । होई सूक्ष्म-मती ह्मणून ह्मणती तो क्षम्य त्याचा गुन्हा ॥ वर्षारंभ सरित्प्रवाह असतो जो कर्दमें मिश्रित । तो हो निर्मळ थोडक्या दिनिं करी लोकांस आनंदित ॥ तेणें श्लाघ्य-गुणास सेव्य गणिती तैसेच राजेश्वरा । दोषें निंदिति * नाल्प घालिति तया सत्कीर्तिचा ते तुरा ॥ दिल्ली - वल्लभ हिंदुचा वर सखा स्वामी प्रजांचा भला । धर्मी सर्व समानतेस निरखी भाग्यें जना लाभला ॥ ९२ ९३ १ पृथ्वीला भूषणभूत अशा अकबरास २ पहिल्यानें 3 हत्ती. ४ तारुण्यांत. ५ पावसाळ्याच्या आरंभी. * (न+अल्प)